Live Breaking News & Updates on Sania mirzab ankita raina

Stay informed with the latest breaking news from Sania mirzab ankita raina on our comprehensive webpage. Get up-to-the-minute updates on local events, politics, business, entertainment, and more. Our dedicated team of journalists delivers timely and reliable news, ensuring you're always in the know. Discover firsthand accounts, expert analysis, and exclusive interviews, all in one convenient destination. Don't miss a beat — visit our webpage for real-time breaking news in Sania mirzab ankita raina and stay connected to the pulse of your community

'डबल डिजिट' पदके जिंकण्याचे भारताचे लक्ष्य – तरुण भारत

'डबल डिजिट' पदके जिंकण्याचे भारताचे लक्ष्य – तरुण भारत
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Beijing , China , Bhavani , Tamil-nadu , India , Tokyo , Japan , Russia , London , City-of , United-kingdom , Rajiv-mehta

हॉकी फायनल न झाल्यास दोन्ही संघांना सुवर्ण


July 17, 2021
6
टोकियो ऑलिम्पिक – दोन्ही संघ कोरोनामुळे खेळू शकत नसल्यास अंमलबजावणी
टोकियो / वृत्तसंस्था
Advertisements
टोकियो ऑलिम्पिकमधील सांघिक इव्हेंट्समध्ये कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता अधिक गृहित धरुन हॉकी फायनल होऊ शकली नाही तर फायनलमध्ये पोहोचणाऱया दोन्ही संघांना सुवर्णपदकाने सन्मानित केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) शुक्रवारी केली. दोन्ही संघांना कोरोनाचा फटका बसला असेल तर अशा परिस्थितीत हा निर्णय लागू असेल. एखाद्या संघात कोरोनाबाधित खेळाडू असले तरी राखीव खेळाडूंना संघात घेत सामने पूर्ण केले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘नेहमीपेक्षा असामान्य परिस्थितीतील स्पर्धा’, असे टोकियो ऑलिम्पिकचे वर्णन करत एफआयएचचे सीईओ थिएरी वेईल यांनी या बदलांची माहिती दिली. ‘सध्याचे नियम व अटी याबद्दल भविष्यात आणखी तपशीलवार माहिती दिली जाईल. शिवाय, आवश्यकतेनुसार त्यात बदल देखील केले जातील’, असे थिएरी यांनी नमूद केले.
‘खेळाडूंना त्यांचे व संलग्न घटकांचे, नागरिकांचे स्वास्थ्य यानिमित्ताने जपावे लागेल. त्यामुळे, हरसंभव काळजी घ्यावी लागेल. ऑलिम्पिकशी संबंधित प्रत्येक घटकाची सुरक्षितता हा सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल. एखाद्या संघात अगदी 6 ते 7 खेळाडू पॉझिटिव्ह असतील तरी राखीव खेळाडूंसह असा संघ आपले सामने खेळू शकेल, 11 खेळाडू उपलब्ध असतील, तोवर खेळण्याची परवानगी असेल’, याचा त्यांनी पुढे उल्लेख केला.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने स्पोर्ट्स स्पेसिफिक रेग्युलेशन्स (एसएसआर) जारी केले असून यानुसार, एखादा संघ साखळी सामना खेळू शकला नाही तर प्रतिस्पर्धी संघाला 5-0 फरकाने विजयी घोषित केले जाईल आणि जर दोन्ही संघ खेळू शकत नसतील तर गोलशून्य बरोबरी गृहित धरली जाईल. कांस्य पदकासाठी लढतीत एखाद्या संघाने माघार घेतली किंवा तो खेळू शकत नसेल तर अशा परिस्थितीत प्रतिस्पर्धी संघाला विजयी घोषित केले जाईल.
एरवी हॉकी संघात एखाद्या सामन्यासाठी 16 खेळाडू उपलब्ध असतात आणि संघांना आपल्या सामन्याच्या एक दिवस आधी खेळाडूंची यादी सुपूर्द करावी लागते. मात्र, यंदा एकंदरीत परिस्थिती पाहता, प्रत्येक संघांना 16 ऐवजी 18 खेळाडूंना सामावून घेण्याची मुभा दिली गेली आहे. हॉकीप्रमाणेच, फुटबॉल, हँडबॉल, रग्बी, वॉटर पोलो या खेळात देखील राखीव खेळाडू समाविष्ट केले जाऊ शकतात. पहिल्या पसंतीचा गोलरक्षक दुखापतग्रस्त झाल्यास राखीव गोलरक्षकाला देखील पाचारण केले जाऊ शकते. टोकियोतील हॉकी इव्हेंट्सना 24 जुलैपासून प्रारंभ होत आहे.
जोकोविच टोकियो ऑलिम्पिक खेळणार
34 वर्षीय नोव्हॅक जोकोविचने गोल्डन स्लॅमचे ध्येय गाठण्यासाठी आपण टोकियो ऑलिम्पिक खेळणार असल्याचे जाहीर केले. त्याने आपल्या ट्वीटर हँडलवरुन ही घोषणा केली. आपण फ्लाईटची तिकिटे बुक केली असून ऑलिम्पिकमध्ये सर्बियाचे प्रतिनिधीत्व करणे आपल्यासाठी सन्मानाचे आहे, असे जोकोविचने येथे नमूद केले.
अव्वलमानांकित जोकोविच ऑलिम्पिक व अमेरिकन ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीत विजेतेपद संपादन करु शकला तर एकाच कॅलेंडर वर्षात चारही ग्रँडस्लॅम व ऑलिम्पिक जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू बनण्याचा पराक्रम त्याला गाजवता येईल. यापूर्वी फक्त स्टेफी ग्राफ या एकमेव महिला खेळाडूला 1988 मध्ये असा पराक्रम गाजवता आला आहे. यंदा ऑलिम्पिकमध्ये जोकोविच खेळणार असला तरी रॉजर फेडरर, राफेल नदाल, डॉमिनिक थिएम व निक किर्गिओस हे अव्वल खेळाडू तेथे सहभागी होणार नाहीत.
भारताचा सुमीत नागल टेनिस एकेरीसाठी पात्र
नवी दिल्ली ः भारतीय टेनिसपटू सुमीत नागल टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरी खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. 14 जून रोजी जाहीर झालेल्या एटीपी मानांकन यादीत नागल 144 व्या स्थानी होता. त्यानुसार, त्याला थेट एन्ट्री दिली गेली. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने भारतीय टेनिस संघटनेला याची माहिती दिली.
आणखी एक स्पेशालिस्ट एकेरी टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन त्यावेळी 148 व्या स्थानी होता आणि अंतिम क्षणी त्याचा सहभाग निश्चित होणार का, हे पहावे लागेल. युकी भांबरी देखील 127 व्या मानांकनासह ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. मात्र, अमेरिकेत उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागणार असल्याने त्याने माघार घेतली आहे.
सुमीत नागल सर्व औपचारिकता पूर्ण करुन टोकियोत पोहोचू शकत असेल तर त्याला रोहन बोपण्णासह दुहेरीत देखील नशीब आजमावता येईल. बोपण्णा व शरण यांचे एकत्रित मानांकन 113 आहे. भारतीय टेनिस फेडरेशन सध्या दुहेरीतील जागा भरुन काढण्यासाठी एकेरीत पात्र खेळाडूंना प्राधान्य देत आहे. तूर्तास, सानिया मिर्झा व अंकिता रैना यांचा महिला दुहेरीतील सहभाग निश्चित आहे. सानियाने अंकितासह सहभाग निश्चित करण्यासाठी आपले प्रोटेक्टेड रँकिंग वापरले. मानांकनातील पहिले 10 खेळाडू थेट प्रवेशासाठी पात्र ठरतात आणि सानियाने टेनिसमधून ब्रेक घेतला, त्यावेळी ती 9 व्या स्थानी विराजमान होती.
दीपिका म्हणते, नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करेन
कोलकाता ः मागील 2 ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकता आली नाहीत, ती बाब माझ्या मनात यंदा टोकियोमध्ये प्रत्यक्ष खेळताना सलत राहील. मात्र, अशा सर्व नकारात्मक भावनांपासून दूर राहण्याचा मी प्रयत्न करेन, असे भारताची स्टार तिरंदाज दीपिका कुमारी म्हणाली. रांचीची 27 वर्षीय दीपिका जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित तिरंदाज या नात्याने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सातत्याने हुलकावणी देत असलेले यश खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील असेल.
‘यापूर्वी यश मिळवता आले नाही, हा आता इतिहास आहे. मात्र, प्रत्येक वेळी ते अपयश मनात असते. प्रत्यक्ष इव्हेंट सुरु झाल्यानंतर दडपण येणे साहजिक आहे. त्यामुळे, अशा नकारात्मक बाबी विसरण्यावर मी भर देईन’, असे ती पुढे म्हणाली.
युगांडाचा ऍथलिट टोकियोमधून बेपत्ता
टोकियो ः युगांडाच्या पथकातील एक ऍथलिट शुक्रवारी अचानक बेपत्ता झाला असून आयोजन समितीचे पदाधिकारी व पोलीस त्याच्या शोधात आहेत. हा 20 वर्षीय ऍथलिट ओसाका प्रिफेक्चरमधील इझुमिसानो येथे प्रशिक्षण शिबिरात समाविष्ट होता. शुक्रवारी सकाळी या संघाचे सराव सत्र नव्हते व शुक्रवारनंतर तो आपल्या हॉटेलरुममध्ये शेवटचा दिसून आला होता.
हॉटेलमध्ये आढळून न आल्याने पदाधिकाऱयांनी याबाबत पोलिसांना कल्पना दिली. या हॉटेलमध्ये 24 तास देखरेख नव्हती. त्यामुळे, तो हॉटेलमधून केव्हा बाहेर निघून गेला, याचा काहीही मागमूस लागू शकलेला नाही.
Share

Kolkata , West-bengal , India , Osaka , Japan , Tokyo , Uganda , New-delhi , Delhi , Roger-federer , Raphael-nadal , Steffi-graf