vimarsana.com


Lieutenant General Dr. Madhuri Kanitkar As The Vice Chancellor Of The University Of Health Sciences.
नाशिक:आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरुपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर
नाशिक8 तासांपूर्वी
कॉपी लिंक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी ही घोषणा केली. डॉ. कानिटकर सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत. त्यांनी पुणे येथील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केल्यानंतर बालरोगशास्त्र या विषयात एमडी केले आहे.
त्यांनी २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन व संशोधनाचा २२ वर्षांचा अनुभव आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ १० फेब्रुवारी २०२१ रोजी पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त होते.
बातम्या आणखी आहेत...
अ‍ॅप उघडा

Related Keywords

New Delhi ,Delhi ,India ,Pune ,Maharashtra ,Madhuri Dixit ,Science University ,Protection Department Staffa New Delhi ,Army Medical College ,University Vc Dr ,Science University Chancellor ,Madhuri Dixit Rajiv ,Army Medical ,புதியது டெல்ஹி ,டெல்ஹி ,இந்தியா ,புனே ,மகாராஷ்டிரா ,மாதுரி தீட்சித் ,அறிவியல் பல்கலைக்கழகம் ,இராணுவம் மருத்துவ கல்லூரி ,இராணுவம் மருத்துவ ,

© 2025 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.