vimarsana.com


महत्त्वाचे मुद्दे
मुलींची छेड काढणे पडले महागात
तरूणींकडून भामट्यांची भररस्त्यात धुलाई
रोडरोमियोंना 'शिकवला चांगलाच धडा'
विशाल करोळे / औरंगाबाद : दोन भामट्यांनी एका तरुणीचा पाठलाग सुरु केला. सुरुवातीला तिनं दुर्लक्ष केलं, मात्र नंतर अश्लिल शेरेबाजी सुरु झाली. (Molestation of a young woman) पण ती घाबरली नाही, तिनं थेट आपल्या बहिणीला बोलावलं.. आणि मग या दोघा बहिणींनी त्या भामट्यांना असा काही धडा शिकावला की ज्याच्या त्याच्या तोंडी त्यांचीच चर्चा सुरु आहे. (One women molested by Two men in Aurangabad)
औरंगाबादच्या सूतगिरणी चौकातली दृश्यं पाहून तुम्ही म्हणाल हे काय चाललंय. या भामट्यांची फ्री स्टाईल (Freestyle) धुलाई करणारी ही रणरागिणी कोण आहे. ती का त्यांना मारत आहे. मात्र, ज्याची धुलाई सुरु आहे, त्याने छेड काढली आणि मग पूजा पाटील हिने त्याला चांगला धडा शिकवला. तिच्या बहिणीची छेड काढणं या रोडरोमियोंना चांगलंच महागात पडले आहे. 
हे भामटे पुजाच्या बहिणीची छेड काढत होते. अश्लील शेरेबाजी करत होते. त्यांनी औरंगपुरा ते सूतगिरणी चौकापर्यंत तिचा पाठलागही केला. पण घाबरून न जाता तिने आपल्या बहिणीला म्हणजेच पुजाला फोन केला. आणि मग काय तिनं या भामट्यांना भररस्त्यात चांगलाच धडा शिकवला. त्यापैकी एकजण पळून गेला, तर दुसऱ्या भामट्याने हातपाय जोडत, गयावया करत कशीबशी स्वतःची सुटका करवून घेतली.
एरव्ही कुणी छेडलं की मुली घाबरतात, रडतात.. पण इथं वेगळंच चित्र होतं. कुणाच्याही मदतीवर विसंबून न राहता या दोघा बहिणींनी रोड रोमिओंची भररस्त्यात चांगलीच खेटराने धुलाई केली. 
 
तरुण मुलीच नव्हे तर अनेकदा महिला देखील रोडरोमिओंच्या छळाला बळी पडतात. पण मुलींनी थोडीशी हिंमत दाखवली तरी त्यांच्याकडं वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही. प्रत्येक घरात अशी एकतरी पूजा पाटील जन्मायला हवी. 
Tags:

Related Keywords

Aurangabad ,Maharashtra ,India , ,Women Molested ,Young Woman ,Molestation ,Beatings ,அவுரங்காபாத் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,

© 2024 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.