vimarsana.com


मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असं राज म्हणाले
Updated: Jul 11, 2021, 12:58 PM IST
मुंबई : पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झालं. पुण्यातील नवी पेठेत मनसेचं हे मध्यवर्ती कार्यालय तयार करण्यात आलंय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. तसंच यावेळी मराठा आरक्षणाबाबत अडलंय कुठे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तर एकनाथ खडसेंच्या सीडीची वाट पाहत असल्याचा टोलाही लगावला आहे. 
ओबीसी आरक्षण
ओबीसी आरक्षणाबाबत राज ठाकरे म्हणाले,"मराठा आरक्षणाच्या वेळेला मुंबईला मोर्चा निघाला होता, त्यावेळी सगळेच नेते गेले होते.केंद्र सरकारला मान्य आहे राज्य सरकारला मान्य आहे मग अडवलय कुणी ? असा सवाल त्यांनी नेते मंडळींना केलाये. ओबीसी आरक्षण कोर्टात व्यवस्थित मांडलं जात नाही का? सगळ्यांना एका व्यासपीठावर बसवा आणि विचारा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. आरक्षण प्रकरणी राजकारण आहे का काय आहे हे समाजाने बघितलं पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सध्या माझं इंजिन मीच चालवत असून कोण कुणाचा शत्रू आहे हेच कळत नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
खडसेंच्या सीडीची वाट बघतोय
ईडीचा गैरवापर होत आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय, असं राज म्हणाले. यंत्रणांचा गैरवापर होत आहे. काँग्रेसचं सरकार असतानाही गैरवापर होत होता. भाजपचं सरकार असतानाही होत आहे. यंत्रणा काय तुमच्या हातातील बाहुली आहे का? या यंत्रणांचा चुकीचा वापर करून चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केले ते मोकाट आहेत. आणि इतरांवर कारवाई होत आहे. हे चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.
 राणेंना फोन केले होते पण..
केद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांची वर्णी लागली, यावर "मी राणेंना फोन केले होते पण त्यांचे फोन बंद होते, त्यांच्या मुलाला पण फोन केला होता असं राज ठाकरे म्हणाले
पवारच बरोबर सांगतील
नवं सहकार खातं निर्माण करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार चळवळींना धोका निर्माण झाला आहे का?, असा सवाल राज यांना विचारण्यात आला. त्यावर तुम्ही पवार साहेबांनाच विचारा. तेच करेक्ट सांगतील, असं म्हणून त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.
 

Related Keywords

Mumbai ,Maharashtra ,India ,Pune ,Raj Thackeray ,I Raj Thackeray ,Narayan Rane ,Congress The Government ,Central Office ,Pune New ,Maratha Reservation ,Mumbai Front ,மும்பை ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,புனே ,ராஜ் தாக்கரே ,நாராயண் றானே ,மைய அலுவலகம் ,மராத்தா முன்பதிவு ,

© 2025 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.