vimarsana.com


July 1, 2021
12
वेर्णा पोलीस अद्याप संशयाच्या घेऱयात : स्वतंत्र चौकशी आयोगाची मागणी,पोलिसांना सापडलेल्या चिट्टीबाबतही संशय
प्रतिनिधी /वास्को
Advertisements
झुआरीनगर सांकवाळ येथील एमईएस कॉलेजजवळील वसाहतीत मंगळवारी सकाळी झालेल्या तिघांच्या आत्महत्या प्रकरणाचे ठोस कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिसांवरील संशयाचे वातावरण मात्र, अद्याप कायम आहे. या प्रकरणाशीसंबंधीत एक चिट्टी आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केलेला असून त्या चिट्टीबाबतही संशय पसरलेला आहे. दरम्यान, गोमेकॉत मंगळवारी कुटुंबियांनी स्विकारण्यास नकार दिलेले तिन्ही मृतदेह काल बुधवारी रात्री कर्नाटकातील बिजापूरला पाठवण्यात आले.
झुआरीनगरातील एमईएस कॉलेज परिसरात प्रतिष्ठीत लोकांची वस्ती आहे. या परिसरात सर्वत्र बंगले असून एका मोकळय़ा प्लॉटमध्ये सदर प्लॉटच्या मालकानेच एक चाळ बांधून त्यात अनेक कुटुंबाना भाडय़ाने ठेवलेले आहे. हा विषयसुध्दा सध्या चर्चेचा बनला आहे. अंबिगार हे या चाळीतच राहणारे एक कुटुंब आहे. या कुटुंबातील देवाम्मा ही महिला चाळीच्या मालकाच्या घरी कामाला जात होती. हाच धागा या कुटुंबातील तिघांच्या मृत्यूस कारणभूत ठरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शमशुद्दीन खान यांनी केली होती तक्रार
शमशुद्दीन खान नामक मालकाने आपल्या घरात चोरी झाल्याची तक्रार वेर्णा पोलीस स्थानकात केली होती. त्यांनी या चोरी प्रकरणी देवाम्मा हिच्यावर संशय व्यक्त केला होता. तेव्हापासून देवाम्मा, तीचा पती व दिर तसेच देवाम्माच्या भावाची चौकशी वेर्णा पोलिसांनी सुरू केली होती. त्यात देवाम्माचा भाऊ प्रभू तलवार हा हल्लीच तिच्याकडे आला होता. तो अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला या चौकशीत सुरक्षीत ठेवले होते. मात्र, पोलिसांकडून या चौकशीत इतरांना मारहाण होत असल्याचा अंदाज त्याला आला होता. पोलिसांकडून छळवणूक होत होती अशी वाच्छता त्यानेच केलेली आहे. त्यामुळे पोलिसांच्या छळाला घाबरूनच त्या तिघांनी आत्महत्या केल्याचा संशय पसरलेला आहे. पोलिसांनी मात्र, त्या तिघांना मारहाण झाल्याचा आरोप फेटाळलेला आहे.
मृतदेह स्विकारले, रात्री कर्नाटककडे रवाना
पोलिसांकडून झालेली मारहाण तसेच चोरीच्या आरोपाच्या तणावाखालीच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय तसेच त्या तिघांच्या शवविच्छेदनाच्या वेळीही पोलिसांकडून झालेला संशयास्पद व्यवहार अशा गोष्टींमुळे मयताच्या कुटुंबाने मृतदेह स्विकारण्यास नकार देऊन पोलिसांविरूध्द एफआयआर नोंद करण्याची मागणी केली होती. मात्र, मयतांच्या गावातील लोक व इतरांकडून ते मृतदेह गावात घेऊन येण्यासाठी दबाव येऊ लागल्याने बुधवारी संध्याकाळी या कुटुंबाने मृतदेह स्विकारले. रात्री तिन्ही मृतदेह घेऊन त्यांचे जवळचे काहीजण कर्नाटकातील बिजापूरकडे रवाना झाले. पोलिसांनीही या कामी सहकार्य केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपअधीक्षक हरीष मडकईकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र चौकशी करण्याची घोषणा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी केली आहे.
लोकांमध्ये चिट्टीबाबतही संशय
दरम्यान, पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे घाबरून त्या तिघांनी आत्महत्या केल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळण्याबरोबरच आत्महत्या झालेल्या त्या घरात मयतांनी लिहिलेली एक चिट्टी सापडल्याचा दावा पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी केला आहे. सदर चिट्टी कन्नड भाषेत असून त्या चिट्टीत मयतांनी आपल्या काही नातेवाईकांवर आरोप केलेले आहेत. त्या चिट्टीतील आरोपांचा संबंध आत्महत्येच्या घटनेशी असू शकतो. त्यामुळे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण पंकजकुमार सिंग यांनी दिले आहे. मात्र, त्यांनी या चिट्टीतील आरोपांबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. या चिट्टीच्या प्रकरणाबाबतही लोकांमध्ये संशय पसरलेला आहे. आत्महत्येचे ठोस कारण स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांवरील संशय कायम आहे.
आयोग नेमा, पोलिसांना निलंबीत करा
या प्रकरणाची पोलीस उपअधीक्षकामार्फत चौकशी करण्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निर्णयावर  नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ हय़ुमन राईटस् ऑर्गनायझेशनची गोवा शाखा तसेच काऊसिल फॉर सोशल जस्टीस ऍण्ड पीस व इतरांनी टीका केली असून हा आत्महत्येस जबाबदार असलेल्या पोलिसांची पाठराखण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यानी म्हटले आहे. उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांकडून चौकशी करणे चुकीचे आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्यात यावा तसेच या प्रकरणाशी संबंधीत सर्व अधिकाऱयांना तोपर्यंत सेवेतून निलंबीत करण्यात यावे अशी मागणी या संघटनांनी केली आहे. या मजूर कुटुंबाने केलेल्या आत्महत्येच्या कृतीबद्दल या संस्थांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच वेर्णा पोलिसांकडून मयतांना वाईट वागणूक मिळाल्याचे स्पष्ट करून त्यांनी पोलिसांच्या कृतीचा निषेध केला आहे. हा प्रकार सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग करणारा असल्याचे या संघटनांनी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका अल्पवयीन मुलालाही रात्रीच्या वेळी पोलिसांनी एमईएस कॉलेज परिसरातून उचलले होते व त्याला गुन्हेगारासारखी वागणूक दिली होती. या प्रकाराची चौकशी गोवा राज्य बाल अधिकार संरक्षण आयोगाने करावी अशी मागणीही प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आलेली आहे.
पोलिसांनी वाचविली कातडी, राजकारणी गप्प
झुवारीनगरातील एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या करण्याचे प्रकरण वेर्णा पोलिसांवर शेकले असते. मात्र, पोलिसांनी अत्यंत धूर्तपणे या प्रकरणात आपली कातडी वाचविण्यात यश मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, त्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांवर हे प्रकरण शेकणार असल्याचे चित्र मंगळवारी निर्माण झाले होते. मात्र, बुधवारी जेव्हा हे मृतदेह बिजापूर-कर्नाटकमध्ये पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात आली तेव्हाच या प्रकरणातून पोलिसांनी आपली कातडी वाचविल्याचे स्पष्ट झाले.
वेर्णा पोलीस आत्महत्या केलेल्या हुलगप्पा अंबीयार, गंगाप्पा अंबीयार व देवाम्मा अंबीयार यांना एका प्रकरणात चौकशीसाठी पाचारण करून त्यांचा छळ करीत होते, असा आरोप मंगळवारी झाला होता. या छळामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात आता ज्या व्यक्तीने वेर्णा पोलिसांकडे चोरीची तक्रार केली होती, त्याच्यामागे आत्ता पोलिसांचा ससेमीरा लागण्याची शक्यता देखील नाकारली जात नाही.
शवचिकित्सा गोमेकॉत करण्यासाठी घाई का ?
दक्षिण गोव्यात एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीवर दक्षिण गोव्यातच म्हणजे हॉस्पिसियो इस्पितळात शवचिकित्सा केली जाते. मात्र, मंगळवारी झुवारीनगरातील या तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्यानंतर शवचिकित्सा मडगावच्या हॉस्पिसियोत न करता बांबोळीतील गोमेकॉत करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थितीत झालेले आहेत.
कोविड चाचणी न करताच केली शवचिकित्सा?
हॉस्पिसियोत शवचिकित्सा करण्यासाठी आणखी मृतदेह होते का? तसेच शवागरात मृतदेह ठेवण्यासाठी जागा नव्हती का? असे सवाल उपस्थितीत झालेले आहेत. कोविडच्या काळात हॉस्पिसियोत एखाद्या व्यक्तीला अपघाती किंवा संशयास्पद मृत्यू आल्यास त्या मयत व्यक्तीची कोविड चाचणी घेतली जाते व त्यानतंर शवचिकित्सा केली जाते. या आत्महत्या प्रकरणातील व्यक्तीची देखील कोविड चाचणी केली जाणार होती. मात्र, त्यासाठी पोलीस का थांबू शकले नाहीत, हा सवाल अत्यंत महत्वाचा आहे.
सर्व राजकीय पक्षांचे नेते गप्प का ?
राज्यात एखादी घटना खडली की, त्वरित सरकारच्या विरोधात असलेले राजकीय पक्ष त्वरित आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात व सरकार टीका करतात. मात्र, या प्रकरणात सर्व राजकीय पक्षांनी का मौन पाळले आहे, असा सवाल उपस्थितीत झालेला आहे. राजकीय नेते कुणाची तरी पाठराखण करतात असा संशय व्यक्त झालेला आहे.
Share
previous post

Related Keywords

Madgaon ,Goa ,India ,Karnataka ,Verna Kelly , ,Vasco ,Protection Commission ,Station Kelly ,Start Kelly ,Sub Harish ,Goa State ,South Goa ,Hospital Kelly ,After Madgaon ,மட்கொன் ,கோவா ,இந்தியா ,கர்நாடகா ,வாஸ்கோ ,ப்ரொடெக்ஶந் தரகு ,கோவா நிலை ,தெற்கு கோவா ,

© 2024 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.