vimarsana.com


तुम्ही संतजनी । माझी करा विनवणी ।। 
Advertisements
तैसे माझे दंडवत । निरोप सांगतील संत ।।
संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवीत सध्याच्या प्रत्येक वारकरी भक्तांची अवस्था दडलेली आहे. प्रमुख संतांच्या पादुका एकादशीच्या सोहळयासाठी पंढरीत येऊन विसावल्या आहेत. तथापि कोरोनामुळे लेकुरवाळा विठुराया निवडक वारकऱयांच्या उपस्थितीतच यंदाही आषाढवारी साजरी करावी लागत आहे. तर मुख्यमंत्री रात्री उशीरा शासकीय महापुजेसाठी दाखल झाले आहेत.
 संतांच्या पादुका 40 व्यक्तींसह दुपारीच वाखरीत दाखल झाल्या. त्यानंतर इसबावी जवळच्या विसावा मंदिरापर्यंत सर्व वारकरी मानाच्या पादुकांची चालत वारी होईल. संत नामदेवरायांनी संतांचे स्वागत केले आणि पुन्हा वारकरी प्रतिनिधी व्यक्तींसह संतांच्या पादुका चालत पंढरपुरात रात्री उशीराने दाखल झाल्या. आषाढी एकादशीसाठी पंढरीत मानांच्या 9 संताच्या पादुकांसमवेत प्रत्येकी 40 व्यक्ती आल्या आहेत. यावेळी संतांच्या स्वागतासाठी वरुणराजाने देखील हजेरी लावली.
सलग दुसऱया वषी मुख्यमंत्री ठाकरे वाहन चालवत पंढरीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसमवेत पंढरपूरला विठ्ठलाच्या महापूजेसाठी स्वतः वाहन चालवत रात्री उशीराने दाखल झाले. गतवषीच्या आषाढी सोहळय़ामध्ये देखील मुख्यमंत्री ठाकरे स्वतः गाडी चालवत पंढरपुरात दाखल झाले होते. यंदाही परत एकदा मुंबईच्या मातोश्री निवासस्थानापासून पंढरपूरपर्यंत ते स्वतः चार चाकी वाहन चालवत पंढरीत आले आहेत.
सर्वप्रथम माऊली तर सर्वात शेवटी संत तुकाराम महाराज पंढरीत दाखल
सोमवारी पंढरपुरात सर्व मानाच्या संतांच्या पादुका दाखल झाल्या. त्यामुळे सर्वप्रथम रुक्मिणी मातेच्या पादुका, त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत चांगवटेश्वर देवस्थान, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई, संत निळोबाराय, संत निवृत्तीनाथ आणि सर्वात शेवटी संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपुरात दाखल झाली.
Share
previous post
next post
Related Stories

Related Keywords

Pandharpur ,Maharashtra ,India ,Mumbai ,Tukaram Maharaj , ,Saint Tukaram Maharaj ,Saint Saints ,பந்தர்பூர் ,மகாராஷ்டிரா ,இந்தியா ,மும்பை ,ட்யூக்ரம் மகாராஜ் ,

© 2025 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.