कोर्टाच्

कोर्टाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री जरंडेश्वरबाबतचे आरोप अजित पवारांनी फेटाळले


पुणे (प्रतिनिधी) : साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने सील केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अडचणीत आल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना उत्तरे दिली. ‘जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे कारखान्याचे संचालक मंडळ ईडीच्या कारवाईला न्यायालयात आव्हान देतील,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. जरंडेश्वर कारखान्याने राज्य सहकारी बँकेतून कर्ज घेऊन ते बुडवल्याचे या बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आले आहे. त्या आधारेच ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरूपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झाले होते. अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या आरोपांना अजित पवार यांनी उत्तरं दिली. ‘हा कारखाना माझ्या नातेवाइकांचा आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. माझ्या माहितीनुसार कायदेशीर प्रक्रियेनुसारच या कारखान्याची विक्री करण्यात आली आहे’ असे ते म्हणाले.
कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार: हजारे
अहमदनगर : ‘राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत मोठा गैरव्यवहार झालेला आहे. कोणता कारखाना कोणाला विकायचा याचे आधीच नियोजन करून संगनमताने हा गैरव्यवहार करण्यात आला आहे,’ असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. ‘आम्हाला कोणत्याही पक्षाशी देणे-घेणे नाही. आता ईडीने जरंडेश्वर कारखान्यापासून सुरुवात केलीच आहे, तर त्यांनी तक्रारीत नमूद सर्व ४९ कारखान्यांचीही सखोल चौकशी करावी’, अशी मागणी अण्णांनी केली आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने सील केली आहे.

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , Pune , Ajit Pawar , Rajendra Kumar Ghadge , Court The Order , Friday Pune , Mill State , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , புனே , அஜித் பவார் , ஆலை நிலை ,

© 2025 Vimarsana