Big Breaking! Ahmadnagar 22 Villages Strict lockdown : vimar

Big Breaking! Ahmadnagar 22 Villages Strict lockdown


मोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' 22 गावांत कडक लॉकडाऊन
बाहेरुन येणा-यांचं गावातील शाळेत 7 दिवसांचं विलगीकरण
Updated: Jul 11, 2021, 11:28 AM IST
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील 22 गावांत 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. पारनेर तालुक्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी येथील परिस्थितीची दखल घेतल कठोर उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्यात. (Big Breaking! Ahmadnagar 22 Villages Strict lockdown ) त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 22 गावांत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोबतच शंभर टक्के चाचण्या तसंच बाहेरुन येणा-यांचं गावातील शाळेत 7 दिवसांचं विलगीकरण करण्यात येणार आहे. लॉकडाऊन काळात गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. तसंच विनामास्क फिरणारे, चौकात पारावर विनाकारण बसणारे, फिरणारे यांचे फोटो काढुन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
रुग्णसंख्या वाढीनं चिंता वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची दखल घेतली. अहमदनगर जिल्ह्यातून रूग्णसंख्या वाढत असताना महत्वाचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील 22 गावांत 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला. पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांत झपाट्यानं वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुख्यमंत्र्यांनी कोरोना स्थितीची दखल घेत बाहेरुन येणा-यांचं 7 दिवस विलगीकरण सक्तीचं केलं आहे 
तालुक्यातील निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलंखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी, सावरगाव, वाळवणे या गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. पुढील आठ दिवस या गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. बाहेरुन आलेले पाहुणे सात दिवस शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहेत.
अमरावती जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचा धोका कायम आहे. आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसचे 20 बळी, तर 122 जणांवर अद्याप उपचार सुरू आहे. हा धोका वाढता पाहता अहमदनगरमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Tags:

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , Ahmednagar , Wadgaon , Dhotre , Pimpalgaon , Andhra Pradesh , Parner , Amravati , Takali Dhokeshwar , Office Center Start , Village School , Ahmednagar District , Amravati District , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , அஹ்மதுநகர் , வட்கொன் , தொற்றே , பீம்பல்கொண் , ஆந்திரா பிரதேஷ் , பார்னர் , அமராவதி , கிராமம் பள்ளி , அஹ்மதுநகர் மாவட்டம் , அமராவதி மாவட்டம் ,

© 2025 Vimarsana