राज्यात च&#x

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा


मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागाने राज्यातील पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील पाच दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अॅलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने रविवार ११ जुलैचा अॅलर्ट जारी करताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना रेड अॅलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, पुणे सातारा, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी येलो अॅलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने सोमवारी १२ जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. तर या दिवशी नाशिक, बुलडाणा, वाशिम, परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं बुधवारी 14 जुलैसाठी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट दिला आहे. तर जालना परभणी, हिंगोली,नांदेड आणि लातूरमध्ये पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Related Keywords

Chandrapur , Maharashtra , India , Hingoli , Satara , Pune , Amravati , Latur , Konkan , Jalna , Ratnagiri , Orissa , Mumbai , Kolhapur , Akola , Buldana , Washim , Palghar , , Climate Of India The Department Sunday Alert , Climate Of India Department Wednesday Konkan , Climate Of India Department , Climate Of India Department Mumbai , Climate Of India The Department Monday Konkan , Orange Alert , Department Sunday Alert , Red Alert , Pune Satara , Yellow Alert , Department Monday Konkan , West Maharashtra , Wednesday Konkan , Jalna Maharashtra , சந்திரபூர் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , ஹிங்கோலி , சதாரா , புனே , அமராவதி , லாதூர் , கொங்கன் , ஜல்னா , ரதணகிரி , ஓரிஸ்ஸ , மும்பை , கோலாப்பூர் , புல்டனை , வாஷிம் , பல்காற் , ஆரஞ்சு எச்சரிக்கை , சிவப்பு எச்சரிக்கை , புனே சதாரா , மஞ்சள் எச்சரிக்கை , மேற்கு மகாராஷ்டிரா ,

© 2025 Vimarsana