Ajit Pawar : जीएसटीच्या (GST) मुद्द्यावरून सुरुवातीपासूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद पाहायला मिळत आहेत. याच मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, अनेक वेळा केंद्राकडून अपेक्षित जीएसटी परतावा मिळालेला नसल्याची टीका राज्य सरकारकडून केली गेली. या पार्श्वभूमीवर आता पेट्रोल आणि डिझेलवर लागू करण्यात येणाऱ्या करांचा मुद्दा देखील चर्चेत आला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जीएसटी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली लखनऊमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये यासंदर्भात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे, तसे संकेत त्यांनी यावेळी दिले. (Ajit Pawar Targets Modi Government On Petrol Diesel In GST)