Konkan Rain Update Chiplun Flood Snakes And Crocodiles Entered The House With Water धुमशान:कोकणात घरात पाण्यासोबत शिरले साप, मगरी; चिपळूणमध्ये 2005 पेक्षा भयानक स्थिती रायगड / विवेक ताम्हणकर18 तासांपूर्वी कॉपी लिंक पुणे : संततधार, खडकवासला धरणातून विसर्गाला सुरुवात मुसळधार पावसामुळे कोकण जलमय झाले आहे. पावसाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला बसला आहे. चिपळूण शहरात ३०० मिमी पडलेला पाऊस, कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये २००५ पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मदत कार्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. दरम्यान, अनेक घरामध्ये साप, मगरी शिरल्याची माहिती आहे. दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मोठा पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे. चिपळूण सध्या पाण्यात आहे. जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टँड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड, भोगाळे, परशुरामनगर परिसरात पाणी वाढत आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. सातारा : जिल्ह्यात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना, उरमोडी, तारळी, खोडशी, कण्हेर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कोयना धरणातून १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे. दरम्यान, कोयना नदीकाठच्या नागरिकांनी न घाबरता सतर्क राहावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. साताऱ्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सांगली : पूरसदृश परिस्थिती,पाणीपातळीत वाढ शक्य दक्षिण महाराष्ट्रात संततधार पावसाच्या हजेरीने सांगली जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक गावांतील नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. दरम्यान, शुक्रवारी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होण्याची भीती पाटबंधारे विभागाचे अभियंता ज्योती देवकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच सांगलीत ४० फुटापर्यंत पाणी येऊ शकते. सध्या कर्नाटकातील आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग ९७ हजार क्युसेकने केला जात आहे. पुणे : संततधार, खडकवासला धरणातून विसर्गाला सुरुवात जुलै महिन्याचे तब्बल वीस दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पुनरागमन केले आणि यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पुणे आणि परिसराने संततधार पावसाचा अनुभव घेतला. पुणे परिसरातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. खडकवासला धरण ९० टक्के भरल्याने गुरुवारी १८ हजार ४६१ क्युसेकने विसर्ग सुरू केला. बातम्या आणखी आहेत...