प्रशिक्ष

प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन म्हणजे म्हाळगी प्रबोधिनी


शिबानी जोशी
महाराष्ट्रात आज आमदारांची संख्या पाहता, सर्वांत मोठा पक्ष भारतीय जनता पार्टीच आहे; परंतु ४०-५० वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती? महाराष्ट्रात काँग्रेसच सर्वेसर्वा होती. त्या काळात सत्ता कुठेही दृषि्टपथात नसताना, अनेक वर्षं विरोधी बाकांवर बसून, संघ विचाराचे अनेक नेते निष्ठेनं समाजकार्य करत होते. समाजकार्य करताना राजकीय सहकार्य देखील मिळत नव्हते. अशाच नेत्यांपैकी एक रामभाऊ म्हाळगी. त्यांची येत्या शुक्रवारी म्हणजे ९ जुलैला जन्मशताब्दी आहे. म्हणूनच त्यांच्या स्मृितप्रीत्यर्थ १९८२ साली सुरू झालेल्या ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ या संस्थेचा परिचय या भागात आपण करून घेऊया…
रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म ९ जुलै १९२१ रोजी पुण्यात झाला. साठ वर्षांच्या अल्पायुष्यामध्ये त्यांनी अनेक विक्रमी कार्य केले, असं म्हणायला हरकत नाही. जनसंघ या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि जनसंघाचे विधानसभेतले ते पहिले आमदार होते. लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा अहवाल मतदारांना दिला पाहिजे, यासाठी रामभाऊंनी आपला वार्षिक कार्य अहवाल त्याकाळात जनतेसमोर ठेवायला प्रारंभ केला होता. रामभाऊ उच्चशिक्षित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. खासदार म्हणून १९७७ आणि १९८० साली ते ठाण्यातून निवडून गेले होते. आणीबाणीच्या काळात त्यांना मिसाखाली अटकही झाली होती. अशा नेत्यांना आज तरुणवर्ग कदाचित ओळखत नसेल; परंतु त्यांच्या नावानं ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ ही प्रशिक्षण संस्था, कात्रज, कडूसला माध्यमिक शाळा, त्यांच्या नावाने अनेक व्याख्यानमाला, ठाणे, पुणे इथल्या रस्त्यांना त्यांचं नाव देऊन त्यांच्या स्मृती जोपासल्या गेल्या आहेत, यातच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं.
आपल्या देशात आज डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक अगदी कलाकार, खेळाडू बनण्याचं प्रशिक्षणही उपलब्ध आहे; परंतु राजकीय नेता बनण्याचं प्रशिक्षण कुठेही मिळत नाही, हे पाच वर्षांपूर्वी खरं होतं; परंतु आता हे विधान असत्य ठरू शकेल. कारण ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’मध्ये ‘आयआयडीएल’अंतर्गत नेता तयार करण्याचा, प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू झाला आहे. निवडून येण्याची क्षमता आणि प्रभावी कामासाठी आवश्यक असलेली गुणसंपदा यातील वाढत चाललेल्या अंतराकडे दुर्लक्ष करता येणार नाही, या आव्हानांची जाणीव होऊन राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण संस्था हवी, अशी संकल्पना विचारवंत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी साठच्या दशकांत मांडली होती; परंतु १९६८ साली त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तशाच प्रशिक्षणाचं स्वप्न रामभाऊ म्हाळगी यांनीही पाहिलं होतं. १९८०ला निवडून आल्यानंतर ते एकदा म्हणाले होते की, “१९८५ला मी निवृत्त होईन किंवा राजकीय संन्यास घेईन; परंतु कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम मात्र मी करत राहीन.” पण १९८२ साली त्यांचं निधन झालं. त्यानंतर संघ व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९८२ला ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ची विधीवत स्थापना केली. त्यानंतर १९९० ते २००६ सोळा वर्षं प्रमोद महाजन संस्थेचे अध्यक्ष होते, त्यांनी प्रबोधिनीला आखीव रूप दिलं. प्रबोधिनीच्या वाटचालीमध्ये प्रा. राम कापसे, गोपीनाथ मुंडे, वसंतराव पटवर्धन अशा अनेकांचं मौलिक योगदान लाभलं. १९८८मध्ये विनय सहस्त्रबुद्धे यांनीही अभिनव कल्पनांचे प्रशिक्षणवर्ग सुरू करून प्रबोधिनीच्या कार्याला खूप गती दिली. सध्या प्रबोधिनीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून महासंचालक म्हणून रवींद्र साठे काम पाहत आहेत. आतापर्यंत साधारण पाच ते सहा लाख जणांनी इथे विविध प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे. ग्रामपंचायत सदस्यपासून खासदारांपर्यंत आणि मंत्री, संस्था, संघटनांचे सर्व प्रकारचे सामाजिक कार्यकर्ते, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक या सर्वांसाठी विविध प्रकारचे दर वर्षी साधारण ५० ते ६० प्रशिक्षण अभ्यासक्रमवर्ग इथे होतात. संघाशी निगडित संस्था असल्यामुळे फक्त समविचारी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असा एक अंदाज होता; परंतु हळूहळू हे सर्वच पक्षांसाठी प्रशिक्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे, दक्षिण आशियामध्ये तरी अशा प्रकारचे हे एकमेव केंद्र असेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते.
प्रशिक्षणाबरोबरच प्रबोधन आणि संशोधन या त्रिसूत्रीवर प्रबोधिनीचे कार्य चालत असल्यामुळे चर्चासत्र, अभ्यास मंडळ, प्रकाशन विभाग, नवोदित पत्रकारांना वास्तवदर्शन पाठ्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, अटल इंक्युबॅशन सेंटर इथे उभं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, दिल्ली येथे कार्यालय, आंतरराष्ट्रीय कक्ष, वॉशिंग्टनच्या विद्यापीठाशी सà¤

Related Keywords

Delhi , India , Mumbai , Maharashtra , Pune , Pramod Mahajan , A Rambhau Mhalgi , Ram Kapse , Vinay Sahasrabuddhe , Rambhau Mhalgi , Maharashtra Congress , Start The Rambhau Mhalgi Academy , Slab Center , Br Ambedkar Library , Starta Academy , Mhalgi Academy , Joshi Maharashtra , July Centenary , Rambhau Mhalgi Academy , General Secretary , Centenary Day , டெல்ஹி , இந்தியா , மும்பை , மகாராஷ்டிரா , புனே , பிரமோத் மகாஜன் , ரேம் கப்ஸெ , ராம்பிௌு ம்ல்கி , மகாராஷ்டிரா காங்கிரஸ் , அப மையம் , ஜநரல் செயலாளர் ,

© 2025 Vimarsana