नालेसफाई, &#

नालेसफाई, कोविड सुविधांबाबत लपवा-छपवी; प्रसाद लाड यांचा आरोप


मुंबई (प्रतिनिधी) : मिठी नदीच्या व नालेसफाईच्या मुंबईतील कामाबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित होत असताना भाजपतर्फे मागविण्यात येणाऱ्या माहितीला बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्रतिसाद मिळत नाही. तीच गत कोविड-१९ साथीच्या उपचारांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांची असून ही माहिती पालिकेकेडून लपविली जात आहे. ही माहिती जर तत्काळ मिळाली नाही, तर आपण न्यायालयात आणि लोकायुक्तांकडे दाद मागू अशा इशारा भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिला आहे.
लाड यांनी मुंबईतील नालेसफाई, मिठी नदीची सफाई तसेच कोविड निवारणासाठी महानगरपालिकेने उभारलेल्या सुविधांमध्ये झालेल्या अनियमितता यांच्या अनुषंगाने गेल्या तीन महिन्यांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबर सतत पाठपुरावा केला आहे.

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , , Party Maharashtra , Mumbai Municipal Corporation , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , கட்சி மகாராஷ்டிரா , மும்பை நகராட்சி நிறுவனம் ,

© 2025 Vimarsana