PM Narendra Modi - Sharad Pawar meeting and Amit Shah - Deve

PM Narendra Modi - Sharad Pawar meeting and Amit Shah - Devendra Fadnavis discussion


दिल्लीत महत्वाची घडामोड; पीएम मोदी - पवार भेट तर अमित शाह - फडणवीस यांच्यात चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत आज महत्वाची भेट झाली.  
Updated: Jul 17, 2021, 12:54 PM IST
Pic Courtesy: ANI
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत आज महत्वाची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पवार आणि मोदी यांची मोदी यांच्या निवसस्थानी ही भेट झाली. दरम्यान, काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही पवार यांची चर्चा झाली होती. राजनाथ यांनी पवार यांना खास दिल्लीत बोलावले होते. 
शरद पवार आणि  मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. (sharad pawar meet pm narendra modi )
पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास मोदी यांची त्यांच्या निवसस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील सांगण्यात आलेला नाही.  मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेले सहकार खाते, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 
Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi pic.twitter.com/NuDCpGQSn8
 फडणवीस - अमित शाह यांची भेट
तर दुसरीकडे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यात तासभर चर्चा झाली. महाराष्ट्र राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या गैरव्यवहारांबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीनंतर राज्यात मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास वैयक्तिक भेटही झाली होती.
Tags:

Related Keywords

New Delhi , Delhi , India , Rajnath Singh , Narendra Modi , Lok Sabha , Sharad Pawar , , Prime Minister Narendra Modi , Defence Rajnath Singh , Prime Minister Office , Central Home , Maharashtra State , Prime Minister , புதியது டெல்ஹி , டெல்ஹி , இந்தியா , ராஜ்நாத் சிங் , நரேந்திர மோடி , லோக் சபா , ஷரத் பவார் , ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி , பாதுகாப்பு ராஜ்நாத் சிங் , ப்ரைம் அமைச்சர் அலுவலகம் , மைய வீடு , மகாராஷ்டிரா நிலை , ப்ரைம் அமைச்சர் ,

© 2025 Vimarsana