बळीराजाव

बळीराजावर आता आस्मानी संकट ९ जुलैपर्यंत राज्यात पाऊस नाही


मुंबई (प्रतिनिधी) :पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता गायब झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. कोरोनाच्या जीवघेण्या संकटामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी आता अास्मानी संकटामुळे पुन्हा एकदा निराश झाला आहे. राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मान्सूनची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी पेरणीलाही सुरुवात केली. पण गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली. काही जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. पण आता ८ ते ९ जुलैपर्यंत पावसाचे पुनरागमन होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात गडगडाटांसह होणाऱ्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. पण येत्या आठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पाऊस सुरू होताच शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता गायब झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , , Department Word , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா ,

© 2025 Vimarsana