संत तुकार&#x

संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान


पिंपरी (वार्ताहर) : देहूत छत्रपती संभाजीराजे यांनी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला गुरूवारी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला. त्याचवेळी त्यांच्यासोबत गमतीदार प्रसंग घडला आणि उपस्थित वारकऱ्यांसह त्यांना देखील हसू आवरता आले नाही. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीचे आज तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे शुक्रवारी प्रस्थान होणार आहे. सकाळपासूनच देहूत ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण जयहरी’चा नामघोष आणि टाळ, मृदंगाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
त्याचवेळी खासदार संभाजीराजे भोसले यांनी देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हजेरी लावली.मात्र, फुगडी खेळता खेळता संभाजीराजेंचा तोल गेला आणिउपस्थित वारकऱ्यांनी त्यांना सावरले. हा प्रसंग अनुभवणाऱ्या वारकऱ्यांना आणि खुद्द संभाजीराजे यांना देखील हसू आवरता आले नाही.

Related Keywords

Pimpri , Maharashtra , India , Ram Krishna , Sambhaji Bhosle , , Saint Tukaram Sir , Truly Saint Tukaram Sir , பிம்ப்ரி , மகாராஷ்டிரா , இந்தியா , ரேம் கிருஷ்ணா ,

© 2025 Vimarsana