देवभूमीत '&#

देवभूमीत 'पुष्कर'राज


इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर
पुष्कर सिंह धामी हे आजवरचे उत्तराखंडचे वयाने सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. त्यांची आमदार म्हणून दुसरीच टर्म आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून तीन दशकांहून अधिक काळ ते सक्रिय आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून तीरथ सिंह यांना हटवून भाजप श्रेष्ठींनी पुष्कर सिंह यांची निवड केली.
पुष्कर सिंह यांना माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आशीर्वाद आहेत. कोश्यारी हे मुख्यमंत्री असताना सन २००१- २००२मध्ये पुष्कर सिंह हे त्यांचे ओएसडी होते. पंचेचाळीस वर्षांचे पुष्कर सिंह यांचा पिठोरगडमध्ये टुंडी गावात एका मध्यवर्गीय कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील हे सैन्यदलात होते. त्यांना तीन बहिणी, घरात एकुलता एक मुलगा म्हणून लहानपणापासून सर्व जबाबदारी नेहमी त्यांच्यावरच पडत असे. कॉलेज जीवनाच्या अगोदरपासून त्यांचा संघाशी संबंध आहे.
कॉलेजमध्ये असताना ते दहा वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सकि्रय होते. मानव संसाधन व्यवस्थापन व औद्योगिक संबंध या विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर भाजपच्या युवा मोर्चाचे काम करू लागले. सन २००२ ते २००८ या काळात ते उत्तराखंड भाजप युवा मोर्चाचे दोन टर्म अध्यक्ष होते. राज्यात भाजपचे सरकार असताना रमेश पोखरियाल निशांक व मेजर जनरल (निवृत्त) बी. सी. खंडुरी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात नगर विकास समन्वय समितीवर राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या उपाध्यक्षपदावर त्यांनी काम केले. सन २०१२मध्ये पक्षाने त्यांना उधमसिंह नगरमधील खतिमा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. सन २०१६ पासून ते प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. २०१७ मध्ये पुष्कर सिंह पुन्हा आमदार म्हणून विजयी झाले. तेव्हाच ते मंत्री होतील, असे वाटले होते. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होणार याची मोठी चर्चा होती, पण तेव्हाही त्यांची संधी हुकली.
उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. अशावेळी राज्यातील तरुणांना आकर्षित करणारा नेता हवा, असा विचार भाजप श्रेष्ठींनी, पुष्कर सिंह यांची निवड करताना केला असावा. मावळते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे केवळ चार महिनेच सर्वोच्च पदावर होते. ते सध्या लोकसभा खासदार आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्यांना आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक होते, पण आठ महिन्यांवर निवडणुका आल्यामुळे राज्यात पोटनिवडणूक होणे कठीणच आहे. तीरथ सिंह यांना हटविण्यामागे तेही एक कारण असावे. राज्यात अनेक ज्येष्ठ मंत्री आहेत. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेलेही पक्षात अनेक आहेत, पण त्या सर्वांना डावलून श्रेष्ठींनी पुष्कर सिंह यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली, याबद्दल अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. उत्तराखंडच्या विधानसभेत एकूण सत्तर आमदार आहेत. पैकी भाजपच्या ५६ आमदारांनी एकमताने पुष्कर सिंह यांची नेतेपदी निवड केली.
तीरथ सिंह रावत हे चार महिने मुख्यमंत्री होते, पण या काळात आपल्या कामाची छाप पाडू शकले नाहीत. मोदी-शहांचे उत्तराखंडमधील दूत आहेत, अशी ते प्रतिमा निर्माण करू शकले नाहीत. कोविड संकटात जनतेला ते आधार देऊ शकले नाहीत. महाकुंभ मेळ्याची जगभर झालेली बदनामी ते रोखू शकले नाहीत. त्यांच्या जन्मदिनाला ९ एप्रिल रोजी ते हरिद्वारला साधू-संतांचे आशीर्वाद घ्यायला गेले होते, तेथे त्यांनी उत्तराखंडमधील ५१ मोठी मंदिरे व देवस्थान बोर्ड सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. पण ते पायउतार होईपर्यंत त्यासंबंधी निर्णय घेऊ शकले नाहीत. सरकारी पाशातून मंदिरांना व देवस्थानांना मुक्त करावे, म्हणून पुरोहितांनी धरणे धरले. चार धाम तीर्थ पुरोिहत महापंचायतीने २९ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून देवस्थान बोर्ड बरखास्त करावे, अशी मागणी केली.
सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकारी अध्यक्षांना पत्रे पाठवून उत्तराखंड सरकारवर दबाव आणण्याची मोहीम राबवली. कोरोनाचे कारण सांगून चार धाम यात्रा बंद झाल्यामुळे पुरोहित, पंडित खूप नाराज झाले. तीरथ सिंह रावत यांचे सरकार हिंदू समाजाला संरक्षण देऊ शकत नाही, असा संदेश सर्वत्र गेला, तोच नेमका तीरथ सिंह यांना महागात पडला.
सन २००० मध्ये उत्तर प्रदेशचे विभाजन करून उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली. एकवीस वर्षांत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर अकरा जण बसले.
९ फेब्रुवारी २००० रोजी भाजपचे नित्यानंद स्वामी उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री झाले. पक्ष नेत्यांच्या नाराजीमुळे २९ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांना राà¤

Related Keywords

Uttaranchal , India , Italy , Uttarakhand , Sun Pushkar Singh , Vijay Bahuguna , B Narayana Dutt , Mohan Bhagwat , Singh Rawat , Bhagat Singh , Narendra Modi , Pushkar Singh , World Hindu Council , Congress The Government , Uttarakhand Assembly , Assembly Election , State Singh , All India , Managementb Industrial , Lok Sabha , Chief Minister , June Prime Minister Narendra Modi , Central Home , Government Hindu , Chief Minister Crown , Harish Rawat , President Rule , உத்தாரன்சல் , இந்தியா , இத்தாலி , உத்தராகண்ட் , விஜய் பஹுகுண , மோகன் பகவத் , சிங் ராவத் , பகத் சிங் , நரேந்திர மோடி , புஷ்கர் சிங் , உலகம் இந்து சபை , உத்தராகண்ட் சட்டசபை , சட்டசபை தேர்தல் , அனைத்தும் இந்தியா , லோக் சபா , தலைமை அமைச்சர் , ஜூன் ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி , மைய வீடு , கடுமையான ராவத் , ப்ரெஸிடெஂட் ஆட்சி ,

© 2025 Vimarsana