प्रेमीजन

प्रेमीजनांचा देवदास कायमचा रुसला…


 
हिंदी चित्रपटसृष्टीचा चालता-बोलता इतिहासच नव्हे, तर सहजसुंदर अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ज्यांचा कायम आदराने उल्लेख केला जाईल, असे ज्येष्ठ, श्रेष्ठ, गुणवान अभिनेते मोहम्मद युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार यांनी बुधवारी सकाळी ९८ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. वृद्धापकाळ आणि श्वसनाचा त्रास यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. असाच त्रास काही दिवसांपूर्वीच जाणवू लागल्यानंतर त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. वाढत्या वयामुळे त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. त्यामुळे झटपट बातम्या देण्याच्या नादात अधूनमधून त्यांच्या निधनाच्या बातम्याही एक-दोन वेळा आल्या आणि त्या खोट्या ठरल्या. पण आजचे त्यांच्या निधनाचे वृत्त कानावर आले आणि दुर्दैवाने ते खरे ठरले. दिलीपकुमार यांना अखेरपर्यंत साथ देणारी आणि त्यांच्यासोबत सर्वत्र सावलीसारखी राहणारी त्यांची पत्नी सायरा बानो यांच्यावर तर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे लाखो चाहतेही आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या जाण्याने गलबलले असतील. दिलीपकुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पेशावर येथे झाला होता. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भारतच नव्हे, तर पाकिस्तानमध्ये आणि जगात जिथे जिथे म्हणून हिंदी सिनेसृष्टीचे चाहते आहेत त्या सर्व देशांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फाळणीनंतर दिलीपकुमार हे भारतात राहिले. मात्र, त्यांच्या मनात पेशावरमधील आपल्या वडिलोपार्जित घराबद्दलच्या भावना कायम होत्या. आपल्या मूळ जन्म ठिकाणाबाबत त्यांच्या मनात एक वेगळी भावना होती. पेशावरमधील लहानपणीचा काळ हा सर्वोत्तम होता, असेही त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. एका निर्मात्याच्या सांगण्यावरून त्यांनी आपले नाव बदलले. त्यानंतर अवघी चित्रपटसृष्टी त्यांना ‘दिलीपकुमार’ या नावाने ओळखू लागली. ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून १९४४ साली त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर दिलीपकुमार यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने आलेल्या दिलीप यांनी एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे देत भारतीय सिनेसृष्टीवर जणू अधिराज्य गाजविले. दिलीपकुमार यांचे सुरुवातीचे शिक्षण नाशिकमध्ये झाले. नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे त्यांचे काही सिनेमे फारसे चालले नाहीत. त्यानंतर अभिनेत्री नूरजहांसोबत त्यांची जोडी हिट ठरली. ‘जुगनू’ हा त्यांचा पहिला हिट सिनेमा ठरला. त्यानंतर दिलीपकुमार यांनी एकामागोमाग एक अनेक हिट सिनेमे दिले. त्यांचा ‘मुगल-ए-आजम’ हा सिनेमा त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. ऑगस्ट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्याकाळी बनलेला सर्वात महागडा सिनेमा होता. सहजसुंदर अभिनय, प्रत्येक भूमिका समरसतेने जगण्याची आणि ती भूमिका, ते पात्र जिवंत करण्याचे कसब त्यांच्यापाशी होते. ते सर्व करण्यासाठी त्यांना विशेष कष्ट घ्यावे लागत नव्हते. कारण दिग्दर्शकाने एकदा भूमिका समजावून सांगितली की, आपसूकच ते त्या भूमिकेशी एकरूप होऊन जात. अशा नैसर्गिक अभिनयाची देणगी त्यांना होती. त्यासाठी कुठल्याशा अभिनय शिबिरात किंवा शाळेत जाण्याची गरज त्यांना भासली नाही. आपल्याला दिलेली भूमिका चोखपणे, प्रामाणिकपणे आणि हुबेहूब ठसविणे यावर त्यांचा गाढा विश्वास होता. सर्वसामान्य माणसाचे दुःख, त्याची पिडा, त्याच्यावर होणारा अन्याय आणि त्याविरोधात पेटून उठण्याची वृत्ती, अल्लड प्रेमवीर हे सर्व दिलीपकुमार यांनी आपल्या कसदार आणि अष्टपैलू अभिनयातून सहजतेने रंगविले, तर काही भूमिका अजरामर केल्या. त्यांच्या अभिनयाची जादूच अशी होती की, कित्येक लोक त्याकाळी स्वतःला दिलीपकुमार समजायचे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचे. त्यांच्या उत्तम अभिनयाची छाप नंतरच्या अनेक अभिनेत्यांमध्ये दिसत होती आणि हे सत्य काही दडून राहिले नव्हते. अनेक मोठे आणि नावाजलेले अभिनेते त्यांच्या अभिनयाची कॉपी करतात, असा शिक्काही प्रारंभी या अभिनेत्यांवर बसला होता. उदाहरणच द्यायचे झाल्यास अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांची नावे प्रामुख्याने घेता येतील. त्यांच्या अभिनयाचे मोजमाप करणेच अशक्य होते. म्हणूनच सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे दिलीपकुमार यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांना १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९४ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००० ते २०००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. १९९८ मध्ये त्यांना पाकिस्तान सरकाà

Related Keywords

Peshawar , North West Frontier , Pakistan , Mumbai , Maharashtra , India , Shah Rukh Khan , Padma Bhushan , Devdas Dilip Kumar , Saira Banu , Dilip Kumar , Rajya Sabha , Dadasaheb Phalke , Mohammad Yusuf Khan , Amitabh Bachchan , Camp Or School , , Hinduja Hospital , Instant News , Friday The Dilip , India As Domination , Education Nashik , Guinness Book , Filmfare Awards , பெஷாவர் , வடக்கு மேற்கு எல்லை , பாக்கிஸ்தான் , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , ஷா ரூக்வ் காந் , பத்மா பூஷன் , சாய்ரா பானு , நீர்த்துப்போக குமார் , ராஜ்யா சபா , தாதாசாகேப் பால்கே , முகமது யூசுப் காந் , அமிதாப் பச்சன் , ஹிஂட்யூவ மருத்துவமனை , உடனடி செய்தி , கின்னஸ் நூல் ,

© 2025 Vimarsana