'दशावतारी' &

'दशावतारी' पहिला मुस्लीम कलाकार


सतीश पाटणकर
दशावतारी नाटके सादर होतात ती हिंदू देवदेवतांच्या पराक्रमांवर आधारित. म्हणून अन्यधर्मीय या कलेत नाहीतच. पण, येथे तर एका मुस्लीमधर्मीय कलाकाराने दशावतार कला सादर केली आणि आज एक उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारून तो नावारूपाला आला आहे. तो म्हणजे अब्दुल कुंजाली नदाफ ! जो आता दोडामार्ग येथील सिद्धेश्वर कंपनीत प्रमुख स्त्रीपात्र भूमिका साकारत आहे. वेतोरे ता. वेंगुर्ला येथील अब्दुल या मुस्लीमधर्मीय कलाकाराने दशावतार कलेमध्ये खासकरून स्त्री भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि खरा कलाकार जातीधर्माच्या बंधनात अडकून पडत नाही, हेही दाखवून दिले आहे.
विशेष म्हणजे, ज्या ज्या नाट्य मंडळांसाठी अब्दुल काम करतो, त्यांनी दाखवलेली मानसिक, वैचारिक प्रगल्भता आणि अब्दुल जेथे जेथे प्रयोगासाठी जातो, अशा ठिकाणच्या मानकऱ्यांनी, ग्रामस्थांनी, रसिकांनी दाखवलेली मानसिकता, वैचारिक प्रगल्भताही निश्चितच कौतुकास पात्र व अभिनंदनीय आहे.
अब्दुलने स्त्री भूमिका कृष्ण मारुती युद्ध (रुक्मिणी), भक्त पुंडलिक (रुक्मिणी), दुर्गाशक्ती (दुर्गा), कांचनगंगा (कांचन), शनी लक्ष्मी युद्ध (लक्ष्मी), कामधेनू हरण (उषा) आदी साकारल्या. तसेच आजपर्यंत त्याने ५०० पेक्षा अधिक नाट्यप्रयोग केले. विशेष म्हणजे मुस्लीम असूनही पौराणिक, वेदांतील प्रसंगांवर संवाद म्हणताना अब्दुल हे आव्हान लीलया पेलतो. कलेसाठी एवढी तळमळीची मानसिकता दाखवणारे हे एकमेव उदाहरण ठरावे.
अब्दुलने आपल्या वेतोरे या गावातीलच श्रीदेवी सातेरी दशावतार नाट्य मंडळातून १०वीमध्ये असताना पहिला नाट्यप्रयोग केला. गावातील बाबी वेतूरकर यांच्याकडून स्त्री भूमिकेचे धडे घेत घरच्या परिस्थितीला हातभार म्हणून १२वी नंतर दशावतार क्षेत्रात २००८ साली दोडामार्ग येथील सिद्धेश्वर दशावतार मंडळातून कला व व्यवसाय म्हणून नाट्यक्षेत्रात प्रवेश केला.
त्यानंतर त्याने कलेश्वर दशावतार व झरेबांबर येथील नाईक दशावतार नाट्यमंडळात स्त्री भूमिका साकारल्या. या तिन्ही मंडळांच्या बाबी कलिंगण व सागर नाईक, केशव खांबल यांनी आपणाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे तो सांगतो. सध्या तो दोडामार्ग येथील सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळात अब्दुल, मालक केशव खांबल यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री अभिनय करत आहे. कोणतीही व्यक्ती नावारूपाला येण्यासाठी त्याच्या कर्मभूमीचे महत्त्वही तेवढेच असते. आपल्या गावाविषयी तो सांगतो की, श्रीदेवी सातेरीमुळे आपण घडलो. पहिला नाट्यप्रयोग या देवीच्या मंडपात करण्याची संधी मला मिळाली. हे माझं भाग्य. त्यावेळी गावातील लोकांनी आपल्यावर कौतुकाची थाप दिली. बाबी वेतूरकर आणि संतोष मांजरेकर यांनी केलेलं मार्गदर्शन आजही उपयोगी येत आहे. त्यामुळे आज मी माझी कलाकार म्हणून जी ओळख आहे ती वेतोरेवासीयांच्या सहकार्यामुळेच आहे.
खेळता नेटके दशावतारी। तेथे येती सुंदर नारी। नेत्र मोडिती कळाकुसरी। परी अवघे धटिंगण।।
या उल्लेखावरून असे अनुमान करण्यात येते की, रामदासांच्या काळी महाराष्ट्रात दशावतार नाट्य प्रचारात असावे आणि मध्यंतरी ते लुप्त झाल्यामुळे काळे यांनी पुन्हा ते कर्नाटकातून महाराष्ट्रात आणले असावे; परंतु रामदासांचा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही प्रदेशांत संचार असल्यामुळे त्यांनी केलेला उल्लेख कर्नाटकातील नाट्यविषयीही असणे शक्य आहे. इ.स.च्या सातव्या शतकात विष्णुपूरच्या मल्लराजाने दशावतारी खेळांची प्रथा सुरू केली, असे सांगतात. कर्नाटकातील यक्षगान हे त्याचे मूळ रूप असून, त्यातूनच महाराष्ट्रातील दशावतार नाट्य उदय पावले आहे.
दशावतारी नाटकाची पूर्वपीठिका फार प्राचीन असून ती इ. स. सातव्या शतकापर्यंत मागे नेता येते, असे एक मत आहे; परंतु त्याला निश्चित आधार नाही. दशावतारी नाटकांमध्ये स्त्रिया काम करत नाहीत. स्त्रियांची भूमिका पुरुषच करतात. पुरुषाचं स्त्रीमध्ये होणारं रूपांतर पाहाणं ही गावकऱ्यांसाठी मोठ्या उत्सुकतेची गोष्ट असते. दशावतारी रंगभूमीने ओमप्रकाश चव्हाणसारखे दिग्गज कलाकार रंगभूमीला दिले. ओमप्रकाश हे मालवण तालुक्यातील आमडोस या गावी राहतात. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी दशावतारात काम करायला सुरुवात केली. गेल्या तीन दशकांत दशावतारी कला जिवंत ठेवण्यामागे ओमप्रकाश चव्हाण, गौतम केरकर, देवा राऊळ यासारख्या मोजक्या कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे. यामध्ये पहिला मुस्लीम कलाकार अब्दुल कुंजाली नदाफ हा होय. एक मुस्लीमधर्मीय बांधव असूनही दशावतारी नाट्यप्रयोगात तो काम करतो. तेही स्त्री पात्र, हे खरोखरच धार्मिक एकोप्याचे किंबहुना सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे, असे वाटते. धार्मिक सलोख्याच्या बाबतीत इतर क्षेत्राप्रमाणे सिं

Related Keywords

Konkan , Maharashtra , India , Karnataka , Malvan , Vengurla , Krishna Maruti , B Sea Naik , , Karnataka Maharashtra , Maharashtrab Karnataka , Start Kelly , Rout Maharashtra , Dashavatari Theater , Chief Minister , கொங்கன் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , கர்நாடகா , மால்வன் , வெங்குர்லா , கிருஷ்ணா மாருதி , கர்நாடகா மகாராஷ்டிரா , தலைமை அமைச்சர் ,

© 2025 Vimarsana