फलज्योति

फलज्योतिष


चंद्रकांत बर्वे
सध्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने फलज्योतिष या विषयाचा विज्ञान शाखेत समावेश करून चर्चेचा माहोल उडवून दिलेला आहे. हां, तशी ही चर्चा खूप वर्षांपासून चालू असतेच. बहुतेक चॅनेल्स पेपर्स वगैरे चर्वितचर्वण करायला नवा विषय नसेल, तर हा विषय घेतात आणि त्यातून सनातन्यांपेक्षा इतर बुद्धिवादी त्यांना निरुत्तर करून भारी पडतात हे जरी असलं तरी तेच सगळे पेपर्स दुसरे दिवशी न चुकता राशिभविष्य छापतात आणि चॅनेल्स एकेका पंडितांचे राशिभविष्य दाखवतात. हा त्यांच्या धंद्याचा भाग आहे म्हणे. याला सन्माननीय अपवाद आकाशवाणी, दूरदर्शन. हां म्हणजे तिथले अधिकारी हे अंधश्रद्ध नाहीत अशातला भाग नाही, पण बिचारे एका सरकारी नियमात अडकलेले आहेत आणि तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक टेम्परामेन्टचा प्रचार करणे व अवैज्ञानिक कल्पनांना थारा न देणे आणि सर्व केंद्रात माझ्यासारखा एखादा असतोच, त्यामुळे बाकीच्यांचा नाईलाज होतो. पण ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र डॉक्टर मंडळींना प्रकृती दाखवावी तशी ज्योतिषांना पत्रिका दाखवत असतात. फलज्योतिष या कल्पनेला काहीही वैज्ञानिक आधार नाही, असे अनेक सायंटिस्टस सांगतात, पण तरीही बरीच सायंटिस्टस मंडळी स्वतःच्या लग्नाला मात्र मुहूर्त बघतात, कारण ही वैज्ञानिक मंडळी विज्ञान हे वैश्विक असतं, ते आपल्या बाकी जीवनातही लागू आहे हे विसरून ते फक्त प्रयोगशाळेत असतं असं समजतात. ते विज्ञान शाखेचा अभ्यास पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून करत असतात. ‘नथिंग कॅन बी क्रिएटेड औट ऑफ नथिंग’ हे जरी त्यांनी पुस्तकात अभ्यास म्हणून शिकलेलं असलं तरी ते सत्य साईबाबांच्या जादूला दैवी चमत्कार समजतात. एकदा मोठी गम्मतच झाली. सत्य साईबाबांचा कार्यक्रम चालू होता. काही बडी मंडळी आलेली होती. दूरदर्शनचे कॅमेरामन देखील ड्युटीवर होते आणि एका कॅमेरात त्यांची जादू उघडी पडली. त्यात त्यांनी लपवलेली वस्तू काढत असतानाची वस्तुस्थिती रेकॉर्ड झाली. ती जादू प्रसारितही झाली, पण पुढे वरून खालपर्यंत चक्रे फिरली आणि ती रेकॉर्डिंगची टेप इरेज करण्यात आली. तेव्हा “वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक टेम्परामेन्टचा प्रचार करणे व अवैज्ञानिक कल्पनांना थारा न देणे” असले नियम दूरदर्शननेच धाब्यावर बसवले. बाबांचा सत्संग चालतो तेव्हा तिथे उपस्थित हजारो अंधभक्तांना असा प्रश्न कधी पडत नाही की, बड्या देशी-परदेशी सेलिब्रििटजना बाबा भारी घड्याळे, सोन्याची अंगठी वगैरे दैवी प्रसाद म्हणून देतात आणि साध्या-सुध्या भक्ताला मात्र फक्त अंगारा का मिळतो!
फार पूर्वी डॉ. अब्राहम कोवूर या श्रीलंकेच्या अभ्यासकाने हे सर्व कसे थोतांड आहेत वगैरे सांगून एक लाखाचे आव्हान दिलेलं होतं, ते जगातील कोणत्याही ज्योतिषाने स्वीकारले नाही. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊनच आपल्या देशात रॅशनालिस्ट असोसिएशनने काम सुरू केलं आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील २१ लाख रुपयांची चॅलेंज योजना ठेवलेली आहे, पण आजपर्यंत कोणताही ज्योतिषी ते आव्हान स्वीकारू शकलेला नाही. ते स्वीकारणारही नाहीत आणि कारण त्यांचा धंदा जोरात चालू आहेच. वकिलाची किंवा वैद्यकीय प्रॅक्टिस करायची असेल किंवा एखाद्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑिडट करायचे असेल, तर त्यासाठी विद्यापीठाची संबंधित डिग्री आवश्यक असते, पण फलज्योतिष कलेत तसं काहीही नाही. कोणीही काहीही भविष्य सांगू शकतो. गंमत म्हणजे, दोन्ही बाजूला सर्व राजकीय पक्षांचे, सर्व जाती-धर्माचे लोकं हिरीरीने बोलत असतात, त्यामुळे सामाजिक तेढ वाढत नाही, ते एक बरंय. नाही तर आरक्षण वगैरे विषयावर वाद घालताना, प्रत्येकजण मी स्वतः जातीयवादी नाही, असं म्हणून जातीय दृषि्टकोन मांडत असतो. एखाद्या पुलाला, विमानतळाला, रस्त्याला नाव देताना मला त्यात राजकारण आणायचं नाही, असे म्हणत आपला राजकीय अजेंडा राबवत असतात. पण फलज्योतिषाचे तसं नाही. जसे आपल्या लोकशाहीत कोणीही कोणत्याही उमेदवाराला मत देऊ शकतो तसेच सगळेजण माझा अनुभव, तर बुवा असा आहे, असे म्हणून फलज्योतिष कल्पनेला सपोर्ट करू शकतात.
मला असं वाटतं की, इग्नूने ‘फलज्योतिष’ म्हणजे astrologyला सपोर्ट करताना त्या astronomy वर बंदी आणली पाहिजे. बघाना चंद्र, सूर्य, शनी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू हे सगळे ग्रह लांबून आपल्यातील एकेकाचा जन्म बघून त्याचं भविष्य लिहीत असतात, पण ते खगोलीय अभ्यासक चंद्राला ग्रह न म्हणता उपग्रह म्हणतात (जणू त्याला नासा किंवा इस्रोने आकाशात सोडलंय) आणि ते राहू आणि केतू हे ग्रह अस्तित्वातच नसतात म्हणे! उद्याला ते देव सुद्धा नसतो म्हणतील. नास्तिक कुणीकडचे. तेव्हा इग्नूने फलज्योतिषाच्या निकोप वाढीसाठी इतर एकेक विज्ञान शाखा बà¤

Related Keywords

Shirdi , Maharashtra , India , Sri Lanka , Chandrakant Barve , Indira Gandhi National , Science Branch , Sai Baba , All India , ஷிர்டி , மகாராஷ்டிரா , இந்தியா , ஸ்ரீ லங்கா , இந்திரா காந்தி தேசிய , அறிவியல் கிளை , சாய் பாபா , அனைத்தும் இந்தியா ,

© 2025 Vimarsana