भाई, माणसा&#

भाई, माणसानं झेपेल तेवढंच करावं


मुंबई (प्रतिनिधी): काँग्रेसच्या महागाईविरोधातील आंदोलनावरून भाजपाने मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांना खोचक टोला लगावला आहे. भाई, तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाने झेपेल तेवढंच करावं. असे पब्लिसिटी स्टंट करताना त्या मुक्या जिवांचा विचार करावा, असे असं ट्विट भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे.
वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात आलं. मुंबईत देखील मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी बैलगाडी वर नेतेमंडळींचं ओझं वाझल्याने गाडी मोडली आणि भाई जगताप यांच्यासहीत सर्व नेते आणि कार्यकर्ते खाली कोसळले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असताना भाजपाकडून हया व्हिडीओच्या माध्यमातून काँग्रेसवर आणि विशेषत: भाई जगताप यांच्यावर टीका केली आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसवर टीका करताना, “राहुल गांधी जिंदाबाद घोषणा देत असताना माणसाचे तर दूरच राहिले पण बैलालाही ते सहन झाले नसावे”, असा टोला त्यांनी लगावला.
प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील टीका करताना, भाई जगतापजी, तोल सांभाळा… महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल.

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , Keshav Upadhye , Rahul Gandhi , Congress As , Mumbai Congress , Mumbai Congress President , Legislative Council , Proficient Darekar , Congress As State , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , கேசவ் உபபதியே , ராகுல் காந்தி , காங்கிரஸ் என , மும்பை காங்கிரஸ் , மும்பை காங்கிரஸ் ப்ரெஸிடெஂட் , சட்டமன்றம் சபை ,

© 2025 Vimarsana