Raj Kundra Had Paid Bribe Of Rs 25 Lakh To Avoid Arrest, Yash Thakur E mailed To ACB पाेर्न चित्रपट प्रकरण:अटक टाळण्यासाठी राज कुंद्राने दिली होती 25 लाखांची लाच, फरार आराेपी यश ठाकूरचा एसीबीला ई-मेल मुंबई19 तासांपूर्वी कॉपी लिंक पाेर्न चित्रपट तयार करून ते ॲपवर अपलाेड करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राने अटकेपासून वाचण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने पोलिसांना २५ लाख रुपयांची लाचही दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट या प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूरने केला आहे. एसीबीला यंदा मार्चमध्येच ई-मेल पाठवून त्याने ही माहिती दिली होती. एसीबीने गुरुवारी त्याला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून एसीबीने हा ई-मेल ३० एप्रिलला मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवला होता. फ्लिज मूव्हीजचा मालक आहे यश ठाकूर यश ठाकूर हा फ्लिज मूव्हीजचा मालक असून ही कंपनी अमेरिकेत नोंदणीकृत आहे. या कंपनीच्या नावाने मॉडेल्स व अभिनेत्रींशी वेबसिरीज आणि शोच्या नावावर करार केले जायचे. कुंद्राची कंपनी पाेर्न चित्रपटांना ठाकूरच्या कंपनीच्या वेबसाइटवर अपलाेड करायची. पोलिसांनी यशच्या बँक खात्यातून ४.५ कोटी रुपये जप्त केले होते. त्याच्याविरुद्ध मध्य प्रदेशात २०२० मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. बातम्या आणखी आहेत...