बोगस लसीक&#x

बोगस लसीकरण रोखण्यासाठी नियमावली


मुंबई (प्रतिनिधी) : कांदिवली परिसरात बोगस लसीकरण झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान आता बोगस लसीकरण रोखण्यासाठी पालिकेने पाऊल टाकले आहे. बोगस लसीकरण टाळण्यासाठी खासगी सोसायटींना आणि आस्थापनांना नोंदणीकृत लसीकरण केंद्राकडून लसीकरण करावे लागणार आहे. याची नोंद केंद्र सरकारच्या कोविन अॅपवर करावी असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
याबाबतचे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. तसेच अशा लसीकरण केंद्रांवर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. कांिदवलीतील हिरानंदानी सोसायटील बोगस लसीकरण झाले होते. तसेच अन्य काही ठिकाणीही बोगस लसीकरणाची प्रकरणे समोर आली होती. याबाबत उच्च न्यायालयानेही तोशेरे ओढले आहेत. दरम्यान आता पालिकेने बोगस लसीकरण रोखण्यासाठी पाऊल टाकले आहे. पालिकेने लसीकरणासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार लसीकरणापूर्वी मुंबई महापालिकेच्या संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना आणि पोलीस स्टेशनला तीन दिवस आधी माहिती देणे आवश्यक आहे. रजिस्टर खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरद्वारेच लसीकरण मोहीम राबवावी लागणार आहे. कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर कोविन पोर्टलवर रजिस्टर आहे की नाही हे पहावे.
सोसायटीने सेक्रेटरीची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करावी. लसीची किंमत, तारीख, खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरणाच्या वेळी अचानक भेट द्यावी. लसीकरणादरम्यान काही गडबड आढळल्यास आरोग्य अधिकाऱ्याने किंवा नोडल ऑफिसरने तत्काळ पोलिसांना किंवा वॉर रूमला कळवावे. लस घेतल्यानंतर प्रमाणपत्राची प्रत्येकाला लिंक उपलब्ध होईल याची नोडल ऑफिसरने खबरदारी घ्यावी, अशी ही नियमावली आहे.

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , Iqbal Singh , , Commissioner Iqbal Singh , Regulations Mumbai , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , இக்ப்யால் சிங் , ஆணையர் இக்ப்யால் சிங் ,

© 2025 Vimarsana