भरपावसात &#x

भरपावसात श्रमजीवी संघटनेचा रास्ता रोको


वाडा (प्रतिनिधी) : भिवंडी – वाडा या महत्त्वाच्या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना वाहनचालकांचे आतोनात नुकसान होत असून वारंवार अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकजण जायबंदी झाले आहेत. कित्येकवेळा प्रशासन व शासनाकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी भिवंडी – वाडा रस्त्यावर एकाच वेळी ६ ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून महामार्ग रोखला. यावेळी संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लाबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे प्रशासनाची यावेळी चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, रामभाऊ वारणा, सुरेश रेंजड, दीपक भोईर आदी नेत्यांनी केले. आंदोलनात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘भिवंडी – वाडा – मनोर’ या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर शासनाने दहा वर्षांपूर्वी सुप्रीम कंपनीला दिले होते. या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी सुप्रीम कंपनीला देण्यात आला होता. वाडा ते मनोर या रस्त्याचे काम सुप्रीम कंपनीने सब ठेकेदार असलेल्या ‘बालाजी कंपनी’ला दिले होते. हे काम कंपनीने दर्जेदार केल्याने या अंतराचा रस्ता सुस्थितीत आहे. त्याशिवाय वनविभागाच्या जागेत असलेला १६ किमी अंतराचा रस्ता अद्यापही दुपदरी आहे. पिंजाळ व देहर्जे या नद्यांवरील पूलही अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. तसेच भिवंडी ते वाडा या अंतराचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता खड्ड्यात जातो. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत मोठे खड्डे पडतात. त्यानंतर उन्हाळ्यात रस्त्याची मलमपट्टी केली जाते आणि पुढे पावसाळ्यात पुन्हा हीच अवस्था कायम असते.
गेली दहा वर्षे हे असेच चालले असून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे अपघात होऊन २५० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे; तर शेकडोजण जायबंदी झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी दुगाडफाटा येथे कुडूस येथील एका डॉक्टर मुलीचा अपघातात मृत्यू झाला होता. तर वारेट येथे खड्ड्यात तोल जाऊन एका नागरिकाचा बळी गेला होता. हा अपघात इतका भयंकर होता की, त्याच्या पत्नीच्या समोर हा अपघात झाला. त्यानंतर आंदोलने झाल्याने हा रस्ता सुप्रीम कंपनीकडून काढून घेण्यात आला व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आला. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेत काहीही फरक पडला नाही. आजही रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेने वाडा, शिरीषपाडा, खुपरी, कुडूस, वडवली, डाकिवली अशा एकूण सहा ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून महामार्ग रोखून धरला. या आंदोलनाची तत्काळ दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली. पालघरचे कार्यकारी अभियंता सपकाळे यांनी आंदोलन स्थळी पोहोचून या रस्त्यावरील सर्व प्रकारचे खड्डे योग्य त्या साहित्याने पेव्हर ब्लॉक, पावसाळी कोल्डमिक्स, इमलशन, डांबर – खडी भरून सदरील रस्त्यावर अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. जर खड्ड्यामुळे अपघात झाल्यास संबंिधत ठेकेदार व अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येईल’, असे लेखी आश्वासन सपकाळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Keywords

Bhiwandi , Maharashtra , India , Palghar , , Supreme The Company , Tuesday Bhiwandi , Association General Secretary , Rambau Varna , Road Maintenance , Road Supreme , Road State , பிவாண்டி , மகாராஷ்டிரா , இந்தியா , பல்காற் , சங்கம் ஜநரல் செயலாளர் , சாலை பராமரிப்பு , சாலை நிலை ,

© 2025 Vimarsana