चंद्राच्

चंद्राच्या पुजाऱयाच्या 'ममी'चे सिटी स्कॅन – तरुण भारत


प्राचीन आजारांचा घेतला जातोय शोध
प्राचीन इजिप्तच्या एका ममीची अलिकडेच अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने पडताळणी करण्यात आली आहे. म्हणजेच ममीचे सिटी स्कॅन करण्यात आले आहे. मरतेवेळी संबंधिताला कुठला आजार होता, त्याचा मृत्यू कसा झाला, अंत्यसंस्काराची प्रक्रिया कशी राहिली असेल, हे शोधण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
Advertisements
ज्या ममीचे सिटी स्कॅन करण्यात आले, ती इजिप्तमधील एका प्रसिद्ध पुजाऱयाची होती. त्याचे नाव अंखेखोंसू होते, याला द ममी ऑफ अंखेखोंसू म्हटले जाते. ही ममी इटलीच्या बर्गामो सिविक आर्कियोलॉजी म्युझियममधून मिलानच्या पॉलीक्लिनिको हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे सिटी स्कॅन करत ममीशी संबंधित रहस्यांची उकल करण्याचा प्रयत्न झाला आहे.
अंखेखोंसूची ममी सुमारे 3 हजार वर्षे जुनी आहे. तपासणी करण्यात आल्यावर त्याचे जीवन आणि अंत्यसंस्काराशी संबंधित माहिती जाणून घेण्याची संधी मिळेल. कुठलीही ममी एक बायोलॉजिकल म्युझियम असते. ती एखाद्या टाइम कॅप्सुलपेक्षा कमी नसते. त्यांची तपासणी केल्यावर आम्हाला प्राचीन आजार, जगण्याची पद्धत, मृत्यूचे कारण इत्यादी माहिती मिळू शकते असे उद्गार ममी प्रोजेक्ट रिसर्चच्या संचालिका सबीना मालगोरा यांनी काढले आहेत.
या ममीचे नाव सॅक्रोफॅगसमधून आले आहे. ख्रिस्तपूर्व 900 ते 800 सालातील ही बाब असावी. तेव्हा अंखेखोंसू जिवंत होता. तो मेल्यावर सुमारे 5 ठिकाणी ‘द गॉड खोंसू इज अलाइव्ह’ असे लिहिले गेल्याचे आढळून आले आहे. असे का केले गेले हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सिटी स्कॅन केल्याने इजिप्तच्या मममीचे जीवन आणि मृत्यूमधील संबंध समजणार आहे. तसेच कुठल्याही मृतदेहाला ममीचे स्वरुप देण्यासाठी कुठल्या रसायनांचा वापर करण्यात आला, त्यासंबंधी कुठली प्रक्रिया होती, याची माहिती मिळणार असल्याचे सबीना म्हणाल्या.
सबीना यांच्या टीमने या ममीला सिटी स्कॅन यंत्रात ठेवून त्याचे मेडिकल रेडियोलॉजी स्कॅनिंग केले. यादरम्यान संगणकाच्या मदतीने ममीच्या शरीरात रेडियोलॉजिकल अध्ययन करण्यात आले. अंखेखोंसू एक पुजारी होता, खोंसू हा शब्द इजिप्तमध्ये चंद्रदेवतेकरता वापरण्यात येतो. इजिप्तमध्ये खोंसूमुळे चंद्रग्रहण होत असल्याचे म्हटले जाते. याचमुळे खोंसूचा पुजारी अंखेखोंसूच्या ममीला अत्यंत पवित्र मानण्यात येते.
Share

Related Keywords

Italy , India , Egypt , , Goes Discovery , Biological Museum , Project Director , இத்தாலி , இந்தியா , எகிப்து , உயிரியல் அருங்காட்சியகம் , ப்ராஜெக்ட் இயக்குனர் ,

© 2025 Vimarsana