नीलेश काब&#x

नीलेश काब्राल गटातून शरेंद्र नाईक सचिवपदासाठी उमेदवार निश्चित


July 13, 2021
9
बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुका 22 ऑगस्टला; काब्रालच्या विरोधात उमेदवार शक्य ; किशोर बांदेकर खजिनदारपदासाठी निश्चित
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
Advertisements
गोवा बुद्धिबळ संघटनेच्या संलंग्नीत तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सालसेत, तिसवाडी आणि पेडणेतील कार्यकारी मंडळाच्या निवडणुका रंगल्यानंतर आता कार्यकारी मंडळावर जाण्यासाठी जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. ऐरव्ही गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुका 30 जुलै रोजी होणार होत्या. मात्र तांत्रिक कारणास्तव या निवडणुका आता 22 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
4 जुलै रोजी सालसेत आणि तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुका झाल्या. बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीसाठी वास्कोतील माता सेकंडरी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष शिरोडकर हे निवडणुक अधिकारी असतील. गोवा बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी मंडळ 12 सदस्यांचे असतील. यात एक अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार, चार उपाध्यक्ष, चार संयुक्त सचिव आणि एक संयुक्त खजिनदार असेल.
सध्या गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत दोन गट उतरण्याची शक्यता आहे. सध्या अध्यक्षपदी असलेले वीजमंत्री नीलेश काब्राल यांना उत्तर गोव्यातून शह मिळण्याची शक्यता आहे. सचिवपदी नीलेश काब्राल यांच्या गटातून माशेच्या एस. एस. आंगले उच्च माध्यमिक स्कूलचे निवृत्त शिक्षक आणि क्रीडा आयोजनात अग्रेसन असलेले शरेंद्र नाईक आणि सालसेत तालुका संघटनेचे अध्यक्ष आशेष केणी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. आशेष केणी हे अध्यक्षपदासाठीही लढू शकतात. त्यांनी गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्षपदीही यापूर्वी भुषविले आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादी आज पूर्ण होणार आहे. निवडणुकीसाठी आताच उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन गट सध्या झाले आहेत. प्रत्येक वेळी दक्षिण गोव्यातीलच अध्यक्ष का, असा सवालही उत्तर गोव्यातील प्रतिनिधी करायला लागलेत. निवडणुकीत समझोता झाला आणि कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडून आले तर 12 जणांच्या व्यवस्थापकीय मंडळात प्रत्येकी 6 जण दक्षिण आणि उत्तर गोव्यातील असू शकतात, असाही एक फॉर्म्युला काढण्यात आला आहे. येत्या काही दिवसात मात्र गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूकीला चांगलीच रंगत येणार आहे.
Share
previous post

Related Keywords

Madgaon , Goa , India , , He Goa Chess The Association , Goa Chess The Association , High School Principal Subhash Fernandes , Madgaon Goa Chess , County Chess , Goa Chess , Association President Keni , North Goa , South Goa , South President , Managing Circle , மட்கொன் , கோவா , இந்தியா , கவுண்டி சதுரங்கம் , வடக்கு கோவா , தெற்கு கோவா , தெற்கு ப்ரெஸிடெஂட் ,

© 2025 Vimarsana