July 16, 2021 12 मुंबई : हय़ुंडाईच्या नव्या अल्काझारने कार विक्रीत जूनमध्ये एमजी हेक्टर व हेक्टर प्लस यांना मागे टाकले असल्याचे दिसून आले आहे. हय़ुंडाईने मागच्या महिन्यात 3 हजार 103 अल्काझार कार्सची विक्री केली होती तर यातुलनेत एमजीने 3002 कार्सची विक्री केली आहे. हय़ुंडाईची नवी अल्काझार ही कार मागच्या महिन्यात लाँच करण्यात आली असून 4000 वाहनांची विक्री आजवर करण्यात आली आहे. सातजण बसतील अशा गटात अल्काझार ही कार आधुनिक वैशिष्टय़ांसह लोकप्रिय होताना दिसते आहे. सीयाम म्हणजेच सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स यांनी अल्काझारच्या कार विक्रीसंबंधीची माहिती दिली आहे. हेक्टर आणि हेक्टर प्लस यांचा विचार केल्यास हेक्टरला ग्राहकांची अधिकची पसंती मिळताना दिसते आहे. अल्काझारच्या तुलनेत मारूती सुझुकीची एक्सएल 6 या कार्सची विक्री जूनमध्ये 3 हजार 978 इतक्या संख्येची झाली आहे. Share