ग्रामीण र&#x

ग्रामीण रुग्णालयांना एक कोटींची वैद्यकीय उपकरणे-पृथ्वीराज चव्हाण


वार्ताहर/ कराड
कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील जनतेला योग्य पद्धतीच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी कराड दक्षिणसह उत्तरमधील काही प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडाळे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाला सुमारे एक कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले 100 बेडचे जम्बो कोव्हिड सेंटर 15 ऑगस्टपासून रुग्णांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Advertisements
  तालुक्यातील कोरोना आढावा व वैद्यकीय उपकरणांच्या आवश्यकतेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शासकीय विश्रामगृह येथे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर व तालुका आरोग्य विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर कोरोनाबाबतच्या उपाययोजना व इंधन दरवाढीविरोधात काँगेसने काढलेल्या सायकल रॅलीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील-उंडाळकर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सर्वत्र कोरोनाची परिस्थिती आवाक्यात येत असताना कराड तालुक्यातील कोरोना बाधितांचे सत्र सुरुच आहे. याला कृष्णा कारखान्याची निवडणूक कारणीभूत आहे. वास्तविक कोरोना काळात कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी आम्ही विरोध दर्शवला होता. मात्र उच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागली. निवडणुकांत प्रचार व सभा झालेल्या कराडसह सांगली जिल्हय़ातील वाळवा व कडेगाव तालुक्यात कोरोना बाधितांची वाढ सुरू आहे.
  तिसऱया लाटेची भीती व्यक्त होत असल्याने तिसरी आलीच, तर कराड तालुक्यातील जनतेला दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 100 बेडचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात येत आहे. 15 ऑगस्टपासून जम्बो कोव्हिड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये पूर्ण मोफत उपचार करण्यात येणार आहेत. उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी सव्वा सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर मलकापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दक्षिणमध्ये रेठरे व पाचवड येथे पुलासाठी निधी मंजूर झाले आहेत. त्याची टेंडर पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. कोरोनामुळे दिरंगाई होत असली, तरी ही कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
Share

Related Keywords

Kadegaon , Maharashtra , India , Malkapur , Andhra Pradesh , Karad , Sangli , Prithviraj Chavan , Bhadri Singh , Yashwantrao Chavan , A Prithviraj Chavan , Rs The Fund , Center Start , Malkapur Municipal Council Admin , Center August , Zila Parishad , Election Instrumental , August Center Start , Water Supply , கடேகான் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , மல்கப்பூர் , ஆந்திரா பிரதேஷ் , காரட் , சங்கிலி , பிரிதுதுவிராஜ் சவான் , யஷ்வந்த்ராவ் சவான் , மையம் ஆகஸ்ட் , ஜில பரிஷாத் , தண்ணீர் விநியோகி ,

© 2025 Vimarsana