July 25, 2021 11 चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व करण्याची भारताला संधी @ Advertisements देशात 30 वर्षांपूर्वी आर्थिक उदारीकरणाची सुरुवात झाली. आता पुन्हा एकदा देश आणि जग वेगवान बदलाच्या मार्गावर असून 2047 पर्यंत अमेरिका आणि चीनप्रमाणेच भारतही ‘अर्थ’संपन्न होईल, असा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केला आहे. जगभरात आर्थिक पातळीवर अभूतपूर्व बदल होत असून भारताला बऱयाच संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एका दैनिकात लिहिलेल्या लेखात या गोष्टींचा उल्लेख दिसून येत आहे. अवघ्या 266 अब्ज डॉलर्सची भारतीय अर्थव्यवस्था आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. नजिकच्या काळात ही वाटचाल गतीशील झाल्यास त्यानुसार 2051 पर्यंत भारत आर्थिकदृष्टय़ा संपन्न देशांपैकी एक होईल. तसेच स्वातंत्र्याच्या शंभरव्या वर्षापर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत तिसऱया क्रमांकाची आर्थिक शक्ती बनू शकते. अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक शक्ती होईल, असे मत अंबानी यांनी आपल्या लेखात मांडले आहे. उदारीकरणामुळे उद्योजकतेच्या ऊर्जेला नवीन आयाम प्राप्त झाले आहेत. त्यातच भारत आता नव्या उंचीला स्पर्श करण्यास तयार आहे. तीस वर्षांपूर्वी उदारीकरणाच्या माध्यमातून पेरलेले आर्थिक प्रगतीचे बीज आज एक मोठे झाड बनले आहे. गेल्या तीस वर्षात अर्थव्यवस्थेतही मोठे बदल झाले असून औद्योगिक प्रगतीचा मार्गही सुकर झाल्याचे ते पुढे म्हणाले. Share previous post