दोघांना क&#x

दोघांना कंठस्नान, तीन जवान जखमी


श्रीनगर / वृत्तसंस्था
Advertisements
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळीही सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. बांदिपोरा जिल्हय़ात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष सुरक्षा पथकाकडून पोलिसांच्या मदतीने येथे शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तसेच दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आहेत. शोधमोहिमेवेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. पोलीस आणि सैन्य दलाकडून झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ही चकमक सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
Share

Related Keywords

Jammu , Jammu And Kashmir , India , , Flint Srinagar , Kashmir Saturday , Military Force , ஜம்மு , ஜம்மு மற்றும் காஷ்மீர் , இந்தியா , காஷ்மீர் சனிக்கிழமை , இராணுவம் படை ,

© 2025 Vimarsana