लस न घेतले&#

लस न घेतलेल्यांना पक्षाघाताचा धोका सातपट अधिक


मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जगभरात लाखो बळी गेले. कोरोनानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं. कोरोनानंतरच्या विकारांनी अनेकांचे बळी गेले. कोरोना होऊ नये, यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्या तरी त्यातलं सर्वात प्रभावी, सुरक्षित आणि चांगलं पाऊल म्हणजे कोरोनापासून बचाव करणारी लस घेणं. लस घेणाऱ्यांना पक्षाघात होत असला, तरी त्याचं प्रमाण कमी असते. उलट, लस न घेतल्यास कोरोना होण्याचा धोका जसा असतो, तसाच पक्षाघाताचा धोकाही सातपट अधिक असतो.
कधी कधी रक्ताच्या गुठळ्या होऊन निरोगी व्यक्तींनाही पक्षाघात होत असतो. पक्षाघात ही हृदयविकाराचंच एक लक्षण आहे. किंबहुना, तो हृदयविकार असतो. कोरोना आणि हृदयविकाराचा जवळचा संबंध वारंवार स्पष्ट झाला आहे. नव्याने केलेल्या एका अभ्यासात तर कोरोनाची लस न घेतलेल्यांमध्ये चेहऱ्याचा पक्षाघात होण्याचं प्रमाण लस न घेतलेल्यांपेक्षा सातपट अधिक असतं. वैज्ञानिक भाषेत या आजाराला बेलचा पक्षाघात म्हणतात. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की लस घेणाऱ्यांमध्येही बेलच्या पॉलिसीचा धोका असतो; परंतु त्याची प्रकरणं फारच कमी आहेत. हा दावा युनिव्हर्सिटी हॉस्पिटल क्लीव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. संशोधनानुसार लस न घेतलेल्या एक लाख लोकांमध्ये बेलच्या पक्षाघाताची ८२ प्रकरणं नोंदली गेली. त्या तुलनेत लस घेतलेल्या एक लाख लोकांचा अभ्यास केला गेला तेव्हा लस घेणाऱ्या एक लाख लोकांमध्ये चेहऱ्याचा पक्षाघात झालेल्यांचं प्रमाण १९ इतकं होतं. त्यातही गंभीर प्रकरणं फारशी नव्हती. पक्षाघातापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोरोनाच्या लसी घेणं आवश्यक आहे, असा सल्ला शास्त्रज्ञ देतात.

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , , University Hospital Medical Center , University School , Western Reserve University School , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , பல்கலைக்கழகம் மருத்துவமனை மருத்துவ மையம் , பல்கலைக்கழகம் பள்ளி , மேற்கு இருப்பு பல்கலைக்கழகம் பள்ளி ,

© 2025 Vimarsana