vimarsana.com


BJP's New Strategy To Overthrow The Alliance Government In Maharashtra Before The Uttar Pradesh Elections?
सत्तांतराची तिसरी लाट!:उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याची भाजपची नवीन व्यूहरचना?
मुंबई11 तासांपूर्वी
कॉपी लिंक
राज्यात जोरदार घडामोडी, कोण करणार कुरघोडी?
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईचे फास आवळले जात असताना, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील ईडीची ‘फाइल' तयार होत आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांना "क्लीन चिट' देणारे तत्कालीन पोलिस महासंचालक परमबीरसिंग हे वाझे-देशमुख प्रकरणानंतर भाजपसोबत गेल्याने, महाविकास आघाडी सरकारविरोधातील घडामोडींना आणखी वेग आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
आजमावणे सुरूच
विधानसभेच्या अध्यक्षपदावरील रिक्त जागेचा मुद्दा या अधिवेशनात निवडणूक घेऊन निकाली काढण्याच्या "सहमती'वर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष आले असले तरी महामंडळांच्या नियुक्त्या, आमदार निधीचे असमान वाटप, मनपा निवडणुकीची स्पर्धा या मुद्द्यांवर तिन्ही पक्ष एकमेकांना आजमावत आहेत. सेना व राष्ट्रवादी नेत्यांत सातत्याने होणाऱ्या बैठकांमुळे तर दोन्ही पक्षांमध्ये सारे काही आलबेल नाही, याची खात्रीच पटू लागली आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांविरोधात ईडीच्या कारवाईचे फास घट्ट करून राज्यात मोठ्या भूकंपाची संधी भाजप शोधत आहे. ‘सरकार पाच वर्षे टिकेल', असे शरद पवारांनी वारंवार सांगणे, शिवसेनेचे कौतुक करणे हे सगळे त्यातूनच आले आहे.
पहिली लाट : पहाटे शपथविधी
२३ नोव्हेंबर २०१९ : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनावर भल्या पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या वळणावर गेले.
दुसरी लाट : महाविकास आघाडी
२६ नोव्हेंबर २०१९ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पुढाकार घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना एकत्र आणत महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवीन सरकार स्थापन केले. २९ नोव्हेंबरला ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
तिसरी लाट : चौकशीचा फेरा
उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निकटवर्तीयांच्या मागे केेंद्रीय चौकशी समित्यांचा ससेमिरा सुरू झाला आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा सत्तापरिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे.
अधिवेशनासह आगामी पंधरवडा ठरणार निर्णायक
सदिच्छा भेटी : मोदी आणि ठाकरे भेटीनंतर वाढल्या हालचाली
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये गुप्त बैठक घेतल्याच्या वृत्तानंतर महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांमधील संशयकल्लोळ तीव्र होत गेला. ३१ मे रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची "सदिच्छा' भेट घेतली आणि जून महिनाभर महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांमधील अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. उद्धव ठाकरे यांची मोदींसोबतची "वैयक्तिक' चर्चा, शरद पवार यांच्या प्रशांत किशोरांसोबत तीन बैठका, महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची काँग्रेसची घोषणा, शिवसेनेच्या वर्धापनदिनी पक्षप्रमुख ठाकरे यांनी "हिंदुत्वा'च्या भूमिकेचा केलेला उल्लेख, मोदींसोबत "जुळवून' घेण्यासाठी ईडीमुळे अडचणीत आलेले शिवसेना आमदार सरनाईकांचे जाहीर पत्र आणि देशमुख, सरनाईकांसोबत अनिल परब, अजित पवार यांच्याविरोधात दिल्लीतील तपास यंत्रणांकडे दाखल होत असलेल्या तक्रारी महाविकास आघाडी सरकारपुढील नजीकच्या काळातील धोक्याचा इशारा ठरत आहेत.
‘मास्टरस्ट्रोक’ची तयारी
बंगालमधील मानहानीकारक पराभवानंतर आणि उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपला असा ‘मास्टरस्ट्रोक' हवा आहे, त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणून, हे सरकार पाडायचे, त्यातील एका पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन करायचे, असा हा ‘गेमप्लॅन' आहे. अत्यंत सावधगिरीने भाजप त्यावर काम करत आहे. त्यादृष्टीने या पावसाळी अधिवेशनासह आगामी पंधरवडा निर्णायक ठरणार आहे. राजधानीत राजकीय हालचालींना विलक्षण वेग आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपचा हा डाव उधळून लावतात की त्याला बळी पडतात, एवढाच मुद्दा आहे.
भाजपची निर्णायक खेळी
देशमुख आणि परब या दोन मंत्र्यांना अटकेच्या दाराशी आणून, अजित पवारांची फाइल तयार करून, याची निर्णायक खेळी खेळली जात असल्याची माहिती आहे. त्यात पश्चिम बंगालमधील यशाचे जनक असलेल्या प्रशांत किशोर यांच्या पवारांसोबतच्या तीन बैठका, भाजप विरोधक यशवंत सिन्हा यांच्या पुढाकाराने पवारांच्या निवासस्थानी झालेली भाजप विरोधकांची बैठक यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग बरखास्त करण्यासाठी ईडीच्या माध्यमातून भाजपला तातडीचे निमित्त सापडले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरापर्यंत ईडीचे जाळे वाढवून त्यासाठीची नेपथ्यरचना सुरू झाली आहे.
जून महिन्यातील राजकीय खेळी
७ जून : शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर बैठक.
८ जून : महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांसह पंतप्रधान मोदींची भेट, मुख्यमंत्री ठाकरे यांची मोदींसोबत "वैैयक्तिक' चर्चा.
९ जून : मोदींसोबत "जुळवून' घेण्याचे व काँग्रेस - राष्ट्रवादी शिवसेना फोडत असल्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्री ठाकरेंना जाहीर पत्र.
१० जून : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवारांकडून शिवसेनेचे कौतुक.
११ जून : प्रशांत किशोर यांची शरद पवारांसोबत बैठक.
१३ जून : महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे सूतोवाच.
१८ जून : स्वबळाच्या घोषणा कुणी देत असेल तर राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र राहणार असल्याचे सेना नेते संजय राऊतांचे स्पष्टीकरण.
१९ जून : शिवसेना वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा "हिंदुत्वा'चा प्रखर उच्चार, नाव न घेता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा.
२० जून : विकास निधींवरून काँग्रेसची शिवसेनेवर टीका, प्रताप सरनाईकांचे पत्र व्हायरल.
२३ जून: कॅन्सर रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सदनिका प्रकल्पाविरोधात शिवसेना आमदाराची तक्रार. विशेष म्हणजे शरद पवारांच्या हस्ते झालेला हा प्रकल्प जितेंद्र आव्हाड यांचा होता.
२३ जून : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेशिवाय भाजपविरोधी घटकांची बैठक.
२४ जून : स्वपक्षीय आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांतर्फे ‘त्या’ प्रकल्पाला स्थगिती.
२८ जून : मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनच्या परस्पर घोषणेवर घटक पक्ष नाराज.
२९ जून : शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी पुन्हा तासभर चर्चा
१ जुलै : अजित पवारांच्या मामांचा साखर कारखाना ईडीकडून जप्त.
बातम्या आणखी आहेत...
अ‍ॅप उघडा

Related Keywords

Shiv ,Rajasthan ,India ,Ahmedabad ,Gujarat ,Uttar Pradesh ,New Delhi ,Delhi ,Anil Deshmukh ,Ajit Pawar ,Mallikarjun Kharge ,November Thackeray ,Sharad Pawar ,Yashwant Sinha ,Ab Congress ,Congress State Nana ,Dec Congress ,Ad Congress ,Congress Jerry ,Shiv Sena ,Chief Minister If Ajit Pawar ,November Thackeray Chief Minister ,Transport Anil Parab ,President Sharad Pawar ,Central Home ,Autumn Pawar ,Distribution Thackeray ,Anil Parab ,Prime Minister Modi ,Autumn Shiv Sena ,After Congress ,Project Jitendra ,Autumn Pawar New Delhi ,Autumn Pawar Chief Minister ,ஷிவ் ,ராஜஸ்தான் ,இந்தியா ,அஹமதாபாத் ,குஜராத் ,உத்தர் பிரதேஷ் ,புதியது டெல்ஹி ,டெல்ஹி ,அனில் தேஷ்முக்ஹ் ,அஜித் பவார் ,ஷரத் பவார் ,யஷ்வந்த் சீன்ஹா ,ட காங்கிரஸ் ,ஷிவ் சேனா ,போக்குவரத்து அனில் பராப் ,ப்ரெஸிடெஂட் ஷரத் பவார் ,மைய வீடு ,அனில் பராப் ,ப்ரைம் அமைச்சர் மோடி ,

© 2025 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.