vimarsana.com


वृत्तसंस्था/ सिल्व्हरस्टोन, ब्रिटन
येथे झालेल्या ब्रिटिश ग्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीत मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने आठव्यांदा जेतेपद पटकावत चॅम्पियनशिप जिंकण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या आहेत. या शर्यतीच्या पहिल्या लॅपवेळी हॅमिल्टनने रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनच्या कारला धक्का दिल्याने त्याला शर्यतीबाहेर पडावे लागले तर हॅमिल्टनला दहा सेकंदाचा दंड करण्यात आला. फेरारीच्या लेक्लेर्कने दुसरे, मर्सिडीजच्या व्हाल्टेरी बोटासने तिसरे स्थान मिळविले.
Advertisements
या शर्यतीला 140,000 चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याने हॅमिल्टनने पहिल्या लॅपमधील कॉप्स कॉर्नरवर व्हर्स्टापेननला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात रेड बुल कार धक्का बसल्याने ट्रकबाहेर गेली आणि बाजूच्या बॅरियरला जाऊन आदळली. यावेळी फेरारीच्या चार्लस लेक्लेर्कने आघाडी घेतली होती. पण हॅमिल्टनने 50 व्या लॅपवेळी त्याला ओव्हरटेक करीत आघाडी घेतली आणि विजयही साकार केला. नंतर रेड बुलने हॅमिल्टनच्या कृतीवर संताप व्यक्त केला. सावधगिरी म्हणून व्हर्स्टापेनला हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले होते. हॅमिल्टनच्या विजयाने रेड बुलची सलग पाच शर्यती जिंकण्याची मालिका खंडित झाली असून व्हर्स्टापेनची आघाडीही 8 गुणांनी कमी झाली आहे. मॅक्लारेनच्या लँडो नोसिरने चौथे, डॅनियल रिकार्दोने पाचवे स्थान मिळविले.
Share
previous post

Related Keywords

United Kingdom ,British , ,British Grand Prix Hamilton ,British Grand Prix ,Cred Max ,ஒன்றுபட்டது கிஂக்டம் ,பிரிட்டிஷ் ,பிரிட்டிஷ் மாபெரும் ப்ரீ ஹாமில்டன் ,பிரிட்டிஷ் மாபெரும் ப்ரீ ,சிவப்பு அதிகபட்சம் ,

© 2024 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.