वनडेत सर्&#x

वनडेत सर्वाधिक धावा आणि यशस्वी कर्णधारही !


Bengaluru: India's Women Cricket team's skipper Mithali Raj at a practice session ahead of the Women's World T20 match at Chinnaswamy stadium in Bengaluru on Monday. PTI Photo by Shailendra Bhojak (PTI3_14_2016_000170A)
वुर्सेस्टर (वृत्तसंस्था): भारताची कर्णधार मिताली राजसाठी इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि अंतिम महत्त्वपूर्ण ठरला. हा सामना जिंकून पाहुण्यांनी व्हाइटवॉश टाळला. शिवाय मितालीने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन विक्रम आपल्या नावे केले.
तिसऱ्या सामन्यात शनिवारी ७५ धावांची नाबाद खेळी करताना ३८ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण धावसंख्या १०३३७वर नेली. वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरली आहे. तिने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्डला मागे टाकले. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये १०२७३ धावा काढण्याचा विक्रम एडवर्डच्या नावावर आहे. या यादीमध्ये न्यूझीलंडची सुझी बेट्स ७८४९ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कर्णधार म्हणूनही हुश्शार
मिताली राजच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम झाला आहे. जगातील सर्वाधिक वनडे सामने जिंकणारी ती महिला कर्णधार ठरली आहे. ५० षटकांच्या प्रकारामध्ये कर्णधार म्हणून तिचा हा ८४ वा विजय आहे. यात, तिने ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कला (८३ विजय़) विक्रमाला मागे टाकले.
भारताचा शेवट गोड
कर्णधार मितालीसह सलामीवीर स्मृती मन्धानाच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर तिसरी वनडे चार विकेट आणि ३ चेंडू राखून जिंकताना भारताने मालिकेचा शेवट गोड केला. इंग्लंडचे २२० धावांचे आव्हान भारताने सहा विकेटच्या बदल्यात ४६.३ षटकांत पार केले. कर्णधार मिताली राजने ८६ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने नाबाद ७५ धावा केल्या. स्मृती मंधानानेही ४९ धावांची खेळी साकारली. अष्टपैलू स्नेह राणाने २४ महत्त्वपूर्ण धावा केल्या. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २१९ धावा केल्या. नताली सिव्हरने त्यांच्यासाठी सर्वाधिक ४९ तर कर्णधार हीथर नाइटने ४६ धावा केल्या. भारताकडून ऑफस्पिनर दीप्ती शर्माने ४७ धावा देऊन तीन विकेट घेतल्या. पावसामुळे सामना ४७ षटकांचा खेळवण्यात आला.
महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर : शांता रंगास्वामी
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना मिताली दुखापतग्रस्त झाली. पण पुढच्याच सामन्यात तिने पुनरागमन केले आणि दमदार अर्धशतक ठोकले. तिच्या कामगिरीमुळे इंग्लंडला निर्भेळ यश मिळवता आले नाही. भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी मितालीला महिला क्रिकेटमधील ‘सचिन तेंडुलकर’ अशी उपाधी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा तिचा विक्रम आपल्याकडे जास्त काळ तिच्या नावे राहील, असा विश्वासही रंगास्वामी यांनी व्यक्त केला.

Related Keywords

Australia , India , Zealand Suzie Bates , Belinda Clarke , Dipti Sharma , , Score Nelly , New Zealand Suzie Bates , Australia Belinda Clarke , ஆஸ்திரேலியா , இந்தியா , ஜீலாந்து ஸஸீ பேட்ஸ் , பெலிண்டா கிளார்க் , டிப்டி ஷர்மா ,

© 2025 Vimarsana