नारायण रा&#x

नारायण राणे यांनी केली शिवसेनेची पळता भुई थोडी…


अरुण बेतकेकर
एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते म्हणून नारायण राणे यांची ओळख होती. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्ष, मंत्री आणि नंतर थेट मुख्यमंत्री असा चढता आलेख त्यांच्या कारकिर्दीचा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे. मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी बेबनाव झाल्याने ३ जुलै २००५ रोजी नारायण राणे यांनी रणशिंग फुंकले. त्या घटनेला आज १६ वर्षे झाली. त्यानिमित्त हा विशेष लेख.
(लेखक स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे, संलग्न शिवसेना, माजी सरचिटणीस आहेत)
शिवसेनेत २००५ सालच्या मध्यावर बंडाळीचे वारे वाहायला लागले होते. मुंबईत वातावरण तापत चालले होते. ३ जुलै २००५ रोजी रंगशारदा सभागृहात महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक सुरू होती. सभागृहाबाहेर शिवसैनिक व नारायण राणे समर्थक शिवसैनिक यांच्यात घोषणा युद्ध सुरू होते. शिवसेनेचे नेतृत्व करत होते कामगार नेते सूर्यकांत महाडिक. या सर्वांच्या गराड्यात असंख्य शिवसैनिकांसमक्ष महाडिक यांना राणे समर्थकांनी बेदम बदडले. त्यांना तेथून पळ काढताना वाकून जमावाच्या पायातून मार्ग काढावा लागला. ही पुढे येऊ घातलेल्या परिस्थितीची नांदी होती. सभागृहात स्वत: बाळासाहेबांनी अल्पशः भाषणाअंती नारायण राणे यांचे शिवसेनेतून निलंबन जाहीर केले. सभागृहात उत्स्फूर्त प्रतिसाद कमी, पण स्मशान शांतता अन हलचल व कुजबुज अधिक झाली. माझ्या सारख्यास लक्षात आले, ही भेग नव्हे तर, भगदाड ठरणार.
नारायण राणे यांना काँग्रेसवासी व्हावे लागले. त्यांच्याबरोबर ७ जुलै २००५ पर्यंत १२ आमदारांनी शिवसेनेचा त्याग केला. त्यात बहुतांश कोकणातील आमदार होते. नियमानुसार सर्वांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. एक राजनीती म्हणून राणे यांनी एकत्र राजीनामे देण्याऐवजी ते टप्याटप्याने देण्याचे ठरविले. तसे केल्यास सर्व निवडणुका एकत्र लागल्या असत्या. सर्वप्रथम नारायण राणे यांच्याच मालवण मतदारसंघात दि. १९ नोव्हेंबर २००५ ही निवडणुकीची तारीख जाहीर झाली. नारायण राणे यांच्यापेक्षा शिवसेनेसाठी ती प्रतिष्ठेची होती. एकतर राणे यांना हरवणे म्हणजेच त्यांचा उभारी घेण्यापूर्वीच राजकीय अस्त करणे आणि दुसरे, कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला हे सिद्ध करणे. सर्वार्थाने ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक ठरली आणि यात नारायण राणे यांनी शिवसेनेला चारीमुंड्या चीत केले.
मालवण मतदारसंघातील बहुतांश शिवसैनिक राणे समर्थक झाले. तेथे शिवसेनेतर्फे परशुराम उपरकर यांना उमेदवारी दिली गेली. निवडणूक प्रचाराला रंग चढू लागला. मुंबईत नारायण राणे यांच्या सामर्थ्याच्या खबरी येऊ लागल्या आणि मुंबईत शिवसेनेत चलबिचल सुरू झाली. तेथील उरले-सुरले शिवसैनिक जगणे कठीण झाल्याने मुंबईला पळून येऊ लागले. सेनेतर्फे मुंबईत बैठकीचे सत्र सुरू झाले. मुंबईस्थित कोकणवासीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिकांना कोकणात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. परिस्थितीची जाणीव झाल्याने कोणाचे पाय मुंबईतून उठेनात. काहींनी आजाराचे ढोंग केले, इस्पितळात दाखल झाले. आदेशाची पायमल्ली होऊ लागली. तेथील यांच्या नात्यागोत्यातील मंडळी, आल्यास तुमच्याबरोबरच आम्हालाही जगणे कठीण होईल, म्हणत यांना कोकणात येण्यापासून परावृत्त करू लागले. शिवाय ही मंडळीसुद्धा राणेसमर्थक झाली होती. तरीही शिवसेनेने जोर-जबरदस्ती, भीती घालत यांना कोकणात धाडले. त्यानंतर शिवसेनेचे सर्व नेते कोकणात पोहोचले, सोबत खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा पोहोचले. पण या सर्वांचे तेथे जीणे मुश्कील झाले. गाड्यांना इंधन मिळेनासे झाले, गाड्यांच्या काचा फोडल्या, तोडफोड झाली. यातील जे कोकणवासीय ज्यांचे निवासस्थान होते, त्यांना नजरकैदेत बंदिस्त व्हावे लागले. लायकी नसताना शिवसेनेमुळे आर्थिकदृष्ट्या गब्बर झालेले जे मुंबईत वाघ बनून मिरवतात, त्यापेक्षा कैकपटीने कोकणात आपल्या गावोगावी मिरवतात. गावच्या मोडकळीस आलेल्या निवासाचे राजवाडे बांधून पैशाची उधळण, धनदौलतीचे प्रदर्शन, वाहनांचे ताफे उडवत तेथील गोर-गरिबांना माज दाखवतात, अशा या वाघांची मांजरे झाली होती. ही मंडळी घराबाहेर पायही ठेवू शकत नव्हती.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे अध्यक्ष गजानन कीर्तिकर आणि मी, अरुण बेतकेकर, सरचिटणीस यांनी महासंघाची, अंदाजे २५० कार्यकर्त्यांची फौज कोकणात उतरवली. तेथे जाण्यासाठी आणि प्रचारासाठी वापरण्यास गाड्या मिळणे कठीण झाले होते. प्रचाराचे आयोजन केले गेले. राहण्याची सोय देवस्थाने, लग्नाचे हॉल, एखाद्याचे निवासस्थान अशा ठिकाणी करण्यात आली होती. २-४ दिवसांतच मालकांवर दबाà¤

Related Keywords

Shiv , Rajasthan , India , Mumbai , Maharashtra , Malvan , Nileshb Nitesh , Sena Bal Thackeray , B Narayan Rane , Datta Dalvi , Surya Mahadik , Lok Sabha , Narayana Rane , Thackeray Narayan Rane , Narayan Rane , Manohar Joshi , Sena Konkan , B Manohar Joshi , Hall Maharashtra Shiv Sena Office , Branch Head , Collector Office , Tcm Hotel , Office Narayan Rane , Committee Federation , Maharashtra Office , Shiv Sena , Best Committee President , Shiv Sena Bal Thackeray , Distribution Thackeray , General Secretary , Shiv Sena Parasurama Powered , Mumbai Narayan Rane , Mumbai Shiv Sena , Mumbai Meeting , Shiv Sena Konkan , Mumbai Tiger , Fort Lok Sabha , Goa Airport , Mumbai Place , ஷிவ் , ராஜஸ்தான் , இந்தியா , மும்பை , மகாராஷ்டிரா , மால்வன் , சேனா பால் தாக்கரே , லோக் சபா , நாராயணா றானே , நாராயண் றானே , மனோகர் ஜோஷி , சேனா கொங்கன் , கிளை தலை , ஆட்சியர் அலுவலகம் , ஷிவ் சேனா , ஷிவ் சேனா பால் தாக்கரே , ஜநரல் செயலாளர் , மும்பை ஷிவ் சேனா , மும்பை புலி , கோவா விமான ,

© 2025 Vimarsana