डेल्टा प्&#x

डेल्टा प्लस व्हेिरएंट आणि निपाहचा धोका


प्रा. नंदकुमार गोरे
कोरोनाच्या विषाणूंमध्ये वेगवेगळं परावर्तन होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. उत्प्रेरित विषाणू अधिकाधिक घातक रूप धारण करत आहेत. ब्राझील, युरोपमधून आलेल्या विषाणूंचे रुग्ण भारतात पाहायला मिळाले आहेत. मात्र जगाने भारतात सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे. त्यातही कोरोनाच्या बाबतीत जगातल्या सात राष्ट्रांच्या पंक्तीत बसलेल्या महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूंच्या संख्येनं महाराष्ट्राच्या उरात अगोदरच धडकी भरली असताना ताज्या दोन बातम्या चिंता वाढवणाऱ्या ठरल्या. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे अनेक रुग्ण सापडले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात रुग्ण आढळल्यानं चिंता वाढणं स्वाभािवक आहे. भोपाळमध्ये डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळला. महाराष्ट्राबरोबरच गुजरात, केरळमध्येही या विषाणूंनी त्रस्त रुग्ण आढळले आहेत. दुसरी बातमीही तितकीच चिंताजनक आहे. चीनच्या वुहानमधल्या प्रयोगशाळेत कोरोनाची निर्मिती झाली आणि तिथेही वटवाघळामुळेच कोरोना पसरल्याचं सांगितलं जातं. आता महाराष्ट्रातल्या वटवाघळात निपाह नावाचा विषाणू आढळला आहे. तो कोरोनापेक्षाही घातक आहे. वटवाघूळ हे या विषाणूचं वाहक असून त्यात कोरोनाचं मूळ आहे. निपाह विषाणूवर अद्याप कोणतीही लस नाही तसंच औषधंही उपलब्ध नाहीत. या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या ६५ पट अधिक आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि निपाह विषाणूच्या वाढत्या संसर्गाने देशाच्या चिंतेत भर पडली आहे.
कोरोना विषाणूने स्वतःमध्ये असे काही बदल केले आहेत की, उपलब्ध औषधं आणि लस त्याच्यावर प्रभाव पाडू शकेल का, याबद्दल शंका निर्माण होत आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा प्लस त्याच्यामधल्या स्पाईक प्रोटीनच्या मदतीनं पेशींवर आक्रमण करतो आणि रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळेच कोरोनावरील लस डेल्टा प्लस विषाणूवर परिणामकारक ठरण्याबद्दल साशंकता आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटवर अँटिबॉडी कॉकटेलचाही परिणाम होत नाही. डेल्टा व्हेरिएंट ऑक्टोबर महिन्यात सर्वप्रथम भारतात सापडला होता. या व्हेरिएंटमुळेच भारतात दुसऱ्या लाटेचा कहर झाल्याचा अंदाज आहे. सध्या इंग्लंडमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. फायझर आणि अॅस्ट्राझेन्काच्या लसी डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण देतात, असा दावा करण्यात आला. सध्या कोरोनावरच्या लसी या अल्फा व्हेरिएंटसाठी बनवण्यात आल्या आहेत. डेल्टा व्हेरिएंट विचारात घेऊन लसी तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे देशात डेल्टाचा धोका कायम आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या निमित्ताने कोरोना विषाणूने पुन्हा एकदा आपलं रूप बदललं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हजारो लोकांचा बळी गेला. आता देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी नवीन ‘डेल्टा प्लस’ विषाणू देशात वेगानं पसरत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस प्रकारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. रत्नागिरी, जळगाव, मुंबई, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर जिल्ह्यात ही प्रकरणं पाहायला मिळाली आहेत. केरळमधल्या पलक्कड आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये एसएआरएस-सीओव्ही-२ डेल्टा-प्लस रूपांच्या किमान तीन घटना आढळल्या आहेत. कडपारा इथल्या चार वर्षांच्या मुलाला या डेल्टा-प्लस वन विषाणूची लागण झाली. कोरोनाचं नवीन रूप चिंता वाढवतं. अत्यंत संक्रमक डेल्टा व्हेरिएंट बी.१.६१७.२ हा व्हेरिएंट प्रथम भारतात सापडला होता. तो डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये बदलत असल्याची शंका आहे. जीवघेणा निपाह विषाणू महाराष्ट्रात दोन वटवाघळांमध्ये आढळून आला.
गेल्या वर्षी जगभरात शिरकाव करणाऱ्या कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं. त्यानंतर म्युकरमायकोसिस आला आणि आता ‘डेल्टा प्लस’चा धोका दिसत आहे. सध्या देशात विषाणूच्या या प्रकाराचे फारसे रुग्ण नसले तरी, त्याच्या प्रसाराचा वेग पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना यासंदर्भात तातडीनं पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. या तीनही राज्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे विषाणू आढळून आल्याने केंद्राने रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध घालण्याचे किंवा तत्सम पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
याच सुमारास पुण्यातल्या ‘नॅशनल इंटिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’च्या शास्त्रज्ञांना महाबळेश्वर इथल्या गुहेत आढळलेल्या दोन वटवाघळांमध्ये निपाह विषाणू सापडला. त्यांचा अभ्यास करणाऱ्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातल्या कोणत्याही व

Related Keywords

India , Bhopal , Madhya Pradesh , Mahabaleshwar , Maharashtra , Mumbai , Ratnagiri , Orissa , Pune , Brazil , China , Jalgaon , Palghar , Kerala Palakkad , Ce Pune National , , Delta Plus , Europe The , New Start , Maharashtra Delta Plus , Bhopal Delta , Maharashtra Gujarat , Delta October , England Delta , Delta Protection , Delta Plus Friday , New Delta Plus , Palghar District , Plus The , Delta Plus Indians , இந்தியா , போபால் , மத்யா பிரதேஷ் , மகாபலேஷ்வர் , மகாராஷ்டிரா , மும்பை , ரதணகிரி , ஓரிஸ்ஸ , புனே , பிரேசில் , சீனா , ஜல்கான் , பல்காற் , கேரள பழக்கத் , டெல்டா ப்லஸ் , யூரோப் தி , புதியது தொடங்கு , மகாராஷ்டிரா குஜராத் , டெல்டா ப்ரொடெக்ஶந் , பல்காற் மாவட்டம் , ப்லஸ் தி ,

© 2025 Vimarsana