पाऊले चाल&#x

पाऊले चालती…


मंजिरी ढेरे
समाधान शोधावं तर वारीत! वारीत चालणारा गावखेड्यातला, शेतकरी कुटुंबातला माणूस समाधानी वृत्ती सोबत घेऊन चालत असतो. इथे भक्तीचं प्रदर्शन नसतं. परमेश्वर आपल्या पदरात काही दान टाकेल, अशी अपेक्षाही नसते. देव भावाचा भुकेला असतो आणि हाच भाव जपत हजारो जण पंढरीची वारी करतात. कोरोनामुळे यंदाही पायी वारी अनुभवता येणार नसली तरी वारीतली सकारात्मकता जगण्याचं बळ देत राहणार आहे.
पंढरीची वारी हा अभूतपूर्व सोहळा. वर्षांनुवर्षं, शतकानुशतकं वारीची ही परंपरा अखंड सुरू आहे. आकाशातून जलधारा बरसू लागल्यावर वारीचे वेध लागायला सुरुवात होते. गावोगावच्या वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस लागते. पालखी प्रस्थानाची लगबग सुरू होते. वारी हा महाराष्ट्राचा, भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एरवी जातीपातीत विखुरलेला आपला समाज वारीच्या निमित्ताने एकत्र येतो. परमेश्वर सर्वांचा आहे आणि आपल्या प्रत्येकात परमेश्वराचा अंश आहे, हीच वारीची शिकवण म्हटली पाहिजे. भगवंताच्या भेटीच्या आशेने झरझर पावलं टाकणाऱ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून आपणही हरखून जातो. वारीतला प्रत्येक भक्त निरपेक्ष वृत्तीने चालत असल्याचं आपल्याला दिसून येतं. वारीत विठुरायाच्या नामाचा गजर अखंड सुरू असतो. ‘जय हरी विठ्ठल’ असं म्हणणाऱ्या वारकऱ्याच्या अंगी निराळी शक्ती संचारलेली असते. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीचं अनुकरण करत विठुरायाच्या नगरीपर्यंतचं अंतर पार केलं जातं. माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी हीच भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते.
प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवायला हवी. वारीचं व्यवस्थापन भल्याभल्यांना अचंबित करणारं. इथे ठरवून काही केलं जात नाही. सगळा भार त्या कर्त्याकरवित्या पांडुरंगाच्या खांद्यांवर टाकला जातो. खरं तर तोच सगळं निभावून नेत असतो. अनेक भक्त आषाढीला कळसाचं दर्शन घेऊन माघारी फिरतात. कारण पुढील वर्षी त्यांना विठुरायाच्या दर्शनाची आस टिकवून ठेवायची असते. मंदिराच्या कळसातच त्यांना पांडुरंग दिसत असतो. समाधान कुठे शोधायचं, तर वारीत शोधायचं. वारीत चालणारा गावखेड्यातला, शेतकरी कुटुंबातला माणूस समाधानी वृत्ती सोबत घेऊनच चालत असतो. इथे भक्तीचं प्रदर्शन नसतं. परमेश्वर आपल्या पदरात काही तरी दान टाकेल, अशीही अपेक्षा नसते. देव भावाचा भुकेला असतो आणि हाच भाव जपत वारकरी पंढरीची वारी करत असतो. वारकऱ्यांच्या अनेक पिढ्या या वारीत दिसतात. वारीची परंपरा सुरू ठेवण्याची जबाबदारी पुढची पिढी अंगावर घेत असते.
गेल्या वर्षी कोरोनामुळे पायी वारी झाली नाही. माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पादुका एसटीने पंढरपुरात दाखल झाल्या. तो अनुपम असा पालखी सोहळा, गोल रिंगण, उभं रिंगण, माऊलींचा अश्व या सगळ्याला आपण मुकलो. यंदाही परिस्थिती बदललेली नाही. कोरोना आहे आणि आपल्या सण-उत्सवांवर त्याची काळी छाया पडली आहे. त्यामुळे यंदाही पादुका विशेष वाहनाने पंढरपुरात दाखल होतील. अर्थात वारीवर आलेलं हे काही पहिलं संकट नाही. याआधीही दुसरं महायुद्ध, प्लेग तसंच अन्य आजारांच्या साथींदरम्यान वारी साधेपणाने झाली होती. यंदाही वारकऱ्यांना विठुरायाची प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही. विठुमाऊली प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे. त्यामुळे घरून केलेला नमस्कार विठू माऊलीपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. वारीने कायमच सकारात्मकता जपली आहे. त्यामुळे कोरोनाचं संकटही टळणार आहे आणि वारीचा हा सोहळा पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. अर्थात यासाठी थोडी वाट मात्र बघावी लागणार आहे.
माऊलीच्या पालखीचे मूळ सत्पुरुष हैबतबाबा आरफळकर यांच्या सेवेतून वारीची प्रथा सुरू झाली. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी असलेल्या सेनाधिकाऱ्यांनी माऊलीचा कृपाप्रसाद झाला म्हणून ज्ञानदेवांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीच्या वारीला जाण्याची प्रथा सुरू केली. त्यानंतर बेळगाव-अंकलीचे सरदार शितोळे यांनी या कार्याला पालखी, घोडे, तंबू, अबदागिरी, माऊलीच्या मुक्कामासाठी शामियाना अशा गोष्टी देऊन सोहळ्याचं रूप दिलं. वासकरांच्या फडातून टाळकऱ्यांची पहिली दिंडी तयार झाली. नंतरच्या काळात हे स्वरूप अफाट झालं. माऊलीच्या रथापुढे सुमारे दीड-दोन लाख वारकरी, पालखीपुढे सव्वीस तर मागे सुमारे दीडशे नोंदवलेल्या दिंड्या आणि त्यामागे नोंदणी नसलेल्या अनेक दिंड्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या भाविक महिला, त्यामागे मुक्कामाची सोय असणारे सामानांचे ट्रक असं वैभवी आणि प्रचंड स्वरूप या सोहळ्याला प्राप्त झालं.
संत तुकारामांच्या परंपरेप्रमाणे इ. स. १६८५मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे नारायण महाराजांनी ज्ञानोबा-तुकà¤

Related Keywords

Pandharpur , Maharashtra , India , Tulsi Vrindavan , Justice Madhavrao , Tukaram Maharaj , Narayana Maharaj , , World War , Start Kelly , Saint Tukaram , Village Sita , Wednesday Peth , பந்தர்பூர் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , துளசி பிருந்தாவன் , ட்யூக்ரம் மகாராஜ் , உலகம் போர் , துறவி ட்யூக்ரம் ,

© 2025 Vimarsana