महाआघाडी

महाआघाडीला घाम फुटलाय…


स्टेटलाइन : सुकृत खांडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्याच मंत्रिमंडळ विस्ताराने राज्यातील महाआघाडीला घाम फुटला आहे. केंद्रात सहकार हे नवे खाते निर्माण करण्यात आले असून त्याची सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविण्यात आल्यामुळे राज्यातील अनेक सहकार सम्राटांच्या भुवया उंचावल्या आहेत. अगोदरच एनआयए, ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात मोठे घोटाळे करणाऱ्यांच्या हात धुवून मागे लागल्या आहेत आणि आता सहकार क्षेत्रावर केंद्राचा अंकुश ठेवला जाणार असेल, तर नवे शुक्लकाष्ट लागू शकते, या विचारानेच अनेकांना घाम फुटला आहे. अमित शहा हे कडक शिस्तीचे नेते म्हणून ओळखले जातात. पक्षातील व पक्षाबाहेरील चुकीचे वागणारे सारे त्यांना वचकून असतात. जो प्रामाणिकपणे निष्ठापूर्वक काम करतो त्यांची मोदी-शहा नेहमीच कदर करतात, पण जे लांडीलबाडीने इतरांची फसवणूक करतात, त्यांना ही जोडी माफ करीत नाही.
सहकार हा विषय घटनेतील तरतुदीनुसार राज्याच्या अखत्यारीत आहे, मग केंद्रामध्ये सहकार खाते का निर्माण केले, अशी कुजबूज महाआघाडीत सुरू झाली आहे. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व अन्य राज्यांत सहकाराचे जाळे मोठे आहे, सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या, बँका, दूध महासंघ, पतपेढ्या आदींची संख्या कित्येक हजारांत आहे. देशभरातील सहकार क्षेत्राकडे बँकांची शेकडो कोटींची कर्जे थकीत आहेत. अनेक संस्था डबघाईला आल्या असून बँकांची कर्जे त्यांनी बुडवली आहेत. अशा संस्थांना चाप लावण्यासाठी केंद्राने सहकार खाते निर्माण करून दिल्लीतून शिट्टी वाजवली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नारायण राणे यांच्याभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण केंदि्रत झाल्याचे दिसले. महाराष्ट्राचा नेता आणि माजी मुख्यमंत्री केंद्रात मंत्री झाल्यावर राणे यांच्यावर चोहोबाजूने अभिनंदनाचा वर्षाव झाला. कोकणात, मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी जल्लोष साजरा झाला.
महाराष्ट्राचा डॅशिंग नेता केंद्रात मंत्री झाला याचा आम जनतेला आनंद झाला. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना लगेचच अभिनंदनाचा साधा फोनही केला नाही. महाआघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी राणे यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या नव्या कारकिर्दीला शुभेच्छाही दिल्या. जे शरद पवारांना सुचले ते ठाकरे यांना का सुचले नाही? राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी राणे यांना शुभेच्छा न देता कटुता कायम राखली. शरद पवार हे मध्यंतरी ब्रीच कँडी इस्पितळात होते. तेथे त्यांच्यावर पाठोपाठ तीन शस्त्रकि्रया झाल्या. तेव्हा नारायण राणे त्यांना भेटण्यासाठी इस्पितळात गेले होते. त्यावेळीही ठाकरे यांना पवारांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी इस्पितळात जावेसे वाटले नाही. राजकीय पक्षाच्या सीमारेषा ओलांडून राणे किंवा पवार काही पथ्य पाळत असतात ते उद्धव यांना जमू नये? जगविख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर स्फोटकांची गाडी ठेवल्याच्या घटनेनंतर खरे तर ठाकरे यांनी स्वत: अंबानींच्या घरी जाऊन त्यांना मुख्यमंत्री म्हणून विश्वास द्यायला हवा होता.
तेव्हाही ते तेथे गेले नाहीत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना दीड वर्षे झाले तरी राज्यात सर्वत्र फिरत नाहीत. प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातही नित्यनियमाने जात नाहीत. अभिनंदन करायला त्यांचे मन मोठे नाही, असे राणे यांनी बोलून दाखवले यातच सारे काही आले.महाराष्ट्रात शिवसेनेला रोखण्यासाठी राणे यांना मोदींनी केंद्रात मंत्री केले, अशी टीका टिप्पणी शिवसेनेचे नेते करीत आहेत. राणे हे काही काल-परवापासून शिवसेनेच्या विरोधात लढत नाहीत. त्यांनी सार्वजनिक जीवनातील तीस वर्षे शिवसेनेत घालवली. शिवसेनाप्रमुखांचे त्यांच्यावर विलक्षण प्रेम होते. त्यांचे मतभेद उद्धव यांच्याशी झाले व त्यानंतर त्यांना बंडाचा झेंडा फडकवावा लागला. शिवसेनेच्या नेतृत्वाशी लढण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रीपदाची गरज नाही. राणे यांनी नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते म्हणून केलेले काम बघूनच मोदींनी त्यांना केंद्रात स्थान दिले आहे. पक्ष विस्तारासाठी नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश व नितेश कसे झटत आहेत हे मोदी-शहा यांनी बघितले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील व अन्य भाजप नेत्यांचा राणे पिता-पुत्रांवर मोठा विश्वास आहे. पुढील वर्षी मुंबईसह डझनभर महापालिका व नंतर २०२४ मध्येे लोकसभा निवडणूक आहे.
भाजपला राज्यात नंबर १ करण्याच्या मिशनमध्ये शतप्रतिशत यश मिळवता यावे म्हणूनच मोदी-शहांनी राणे यांना केंद्रात मंत्रीपद देऊन मोठी शक्तà

Related Keywords

Shiv , Rajasthan , India , Konkan , Maharashtra , Uttar Pradesh , Delhi , Mumbai , Nileshb Nitesh , Sanjay Dhotre , Narendra Modi , Narayan Rane , Bhagwat Karad , Sharad Pawar , Ministryb Narayana Central , Central Council Of Ministers Narayan Rane , Prime Minister Narendra Modi , Central Home , Central Council , Ministers Narayan Rane , Strategies Flood , Autumn Pawar , Distribution Thackeray , Breach Candy Hospital , There Thackeray , Rane Or Pawar , Mukesh Ambani , Maharashtra Shiv Sena , Shiv Sena , Lok Sabha Election , India Pawar , Dev Patil , India Pawar Or Dev Patil , ஷிவ் , ராஜஸ்தான் , இந்தியா , கொங்கன் , மகாராஷ்டிரா , உத்தர் பிரதேஷ் , டெல்ஹி , மும்பை , சஞ்சய் தொற்றே , நரேந்திர மோடி , நாராயண் றானே , பகவத் காரட் , ஷரத் பவார் , ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி , மைய வீடு , மைய சபை , மீறல் மிட்டாய் மருத்துவமனை , முகேஷ் அம்பானி , மகாராஷ்டிரா ஷிவ் சேனா , ஷிவ் சேனா , லோக் சபா தேர்தல் ,

© 2025 Vimarsana