Sharif Called For Help From China, Went To US With His Family For Fear Of Losing His Post; News And Live Updates कारगिल विजय दिवस विशेष:मदत मागण्यासाठी गेलेल्या शरीफ यांची चीनकडून बोळवण, पद जाण्याच्या भीतीने ते कुटुंबासह अमेरिकेला गेले... क्लिंटन म्हणाले - सैन्य हटवावेच लागेल एका दिवसापूर्वी कॉपी लिंक माजी अमेरिकी मुत्सद्दी टेरेसिटा शॅफर यांनी सांगितले कारगिल काळातील शरीफ-क्लिंटन चर्चेतील सत्य अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यानंतर मध्य आशिया आणि विशेषत: भारत-पाकिस्तानच्या संबंधांत एक नवे वळण येणार आहे. दोन्ही शेजारी देशांच्या संबंधांत अमेरिकेची अप्रत्यक्ष भूमिका राहिली आहे. कारगिल युद्धाच्या वेळीही भारतीय सैन्यानेे आघाडी घेतल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या हेतूंवर अमेरिकेच्या कठोर भूमिकेमुळे मोठा परिणाम झाला होता. हे म्हणणे आहे ३० वर्षे अमेरिकी मुत्सद्दी राहिलेल्या टेरेसिटा शॅफर यांचे. त्या श्रीलंकेत राजदूतही होत्या व भारत-पाकिस्तान संबंधांतील तज्ज्ञ आहेत. ‘दैनिक भास्कर’चे रितेश शुक्ल यांच्यासोबतच्या चर्चेत त्यांनी १९९९ च्या घटनांबाबत माहिती दिली. संपूर्ण घटनाक्रम त्यांच्याच शब्दांत... मला ४ जुलै १९९९ चा दिवस चांगला आठवतो. तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांना भेटण्यास आले होते. ते कारगिल युद्धादरम्यान अमेरिकेकडे मदत मागण्यास आले होते. अमेरिकेने मदत करावी, अशी शरीफ यांची इच्छा होती. पण पाकिस्तानला मागे हटावेच लागेल, त्यानंतरच चर्चा होईल, असे क्लिंटन यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. भारतीय सैन्याच्या पवित्र्यामुळे पाकिस्तान आधीच घाबरलेला होता. या युद्धाचे रूपांतर अणुयुद्धात होऊ नये असे अमेरिकेला वाटत होते. कारगिल युद्धाच्या वेळी मी एका थिंक टँकसाठी काम करत होते. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात राहावे लागत होते. शरीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर अमेरिकेच्या प्रेस नोटमध्ये काय आहे, अशी विचारणा पाकिस्तानी राजदूतांनी माझ्याकडे केली होती. पाकिस्तानला विनाअट एलओसीवरून मागे हटावे लागेल एवढाच त्याचा अर्थ आहे, असे मी सांगितले. अमेरिकेने साथ दिली नाही म्हणून पाकिस्तान चकित होता आणि अमेरिकेने तथ्यांच्या आधारावर पाकिस्तानविरुद्ध भूमिका घेतल्याने भारत चकित होता. नवाझ शरीफ आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यात खूप तणाव होता हे स्पष्टच होते. प्रकरण संवेदनशील असल्याने शरीफ यांना युद्धाबाबत जास्त सविस्तर सांगण्यात आले नाही असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्याने सांगितल्यानंतर तर मी चकितच झाले. शरीफ कुटुंबासह अमेरिकेला येत आहेत असे कळाले. अमेरिकेची साथ मिळाली नाही तर पद जाण्याची भीती शरीफ यांना वाटत होती हे समजण्यास आम्हाला वेळ लागला नाही. त्यांची भीती योग्यच होती. मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांना कैद केल्यानंतर पाकिस्तानमधून निघून गेल्यामुळेच त्यांचे कुटुंबीय सुरक्षित राहिले. वाजपेयींना फोनवरून चर्चेची माहिती देत होते क्लिंटन शरीफ ६ दिवस चीनमध्ये राहणार, असे पाकिस्तानच्या हवाल्याने कळले होते. युद्धकाळात शरीफ ६ दिवस चीनमध्ये काय करणार, असा प्रश्न आम्हाला पडला होता. चीननेही पाकला मदत केली नाही. शरीफ यांचा चीन दौरा दीड दिवसातच गुंडाळला गेला. नंतर ते अमेरिकेला आले. अमेरिका, चीन आणि युरोपही अटलबिहारी वाजपेयींच्या बाजूने होते. पाकिस्तानी सैन्य मागे हटल्यानंतरच भारत युद्धबंदी करेल, असे त्यांचे म्हणणे होते. शरीफ यांच्यासोबत होत असलेल्या चर्चेची माहिती क्लिंटन हे वाजपेयींना फोनवरून देत होते. २६ जुलैपर्यंत पाकिस्तानच्या सर्व सैनिकांनी भारतातून माघार घेतली होती. त्यामुळे मुशर्रफ यांनी शरीफ यांना कैद करून सत्ता ताब्यात घेतली. कारगिलचा आणखी एक परिणाम म्हणजे भारत-अमेरिकेचे संबंध जास्त दृढ होत गेले. आज अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानमध्ये नाही. हा अफगाणिस्तानच नव्हे, पाकिस्तानसाठीही संकटाचा काळ आहे. बातम्या आणखी आहेत...