वडिलांकड

वडिलांकडून मुलीला अनोखी भेट


July 14, 2021
5
विवाहानंतर विदेशात स्थायिक होणार होती मुलगी,
मुलीसोबत 15 दिवसांच्या बाइक राइडवर निघाले वडिल
अहमदाबादच्या एका पित्याने मुलीला विवाहापूर्वी अशी भेट दिली आहे, ज्याची इच्छा प्रत्येक मुलीच्या मनात असते, पण ते तिला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नसते. ही इच्छा म्हणजे वडिलांनी तिच्यासाठी दिलेला वेळ. याचमुळे गुजरातचे व्यावसायिक प्रकाश पटेल यांनी मुलगी प्रियलसोबत पंधरा दिवसांसाठी बाइकने हिंडण्याची योजना आखली.
Advertisements
या 15 दिवसांमध्ये ते मुलगी प्रियलसोबत सोनमर्ग, लेह, मनालीसह 1784 किलोमीटर बाइकवरूनच फिरले. प्रियल विवाहानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार असल्याने प्रकाश पटेल यांनी या स्मरणीय सफरीचे आयोजन केले. ही राइड माझ्या जीवनासाठी अनमोल क्षणासारखी आहे, गाडी, बंगला आणि दागिन्यांपेक्षा हे अधिक मूल्यवान असल्याचे प्रियल सांगते.
प्रियलचा 6 महिन्यांमध्ये विवाह होणार आहे, याचमुळे तिच्यासोबत स्ट्राँग क्वालिटी टाइम घालवू इच्छित होतो, याचकरता पत्नी आणि धाकटय़ा मुलीला या बाइक प्रवासात सोबत घेतले नाही. बाइकवरून प्रवासादरम्यान मी माझ्या जीवनाचे आनंदाचे क्षण मुलीसोबत घालवू शकलो असे प्रकाश यांनी म्हटले आहे.
Share
previous post

Related Keywords

Australia , Ahmedabad , Gujarat , India , , Light Patel , Her Time , ஆஸ்திரேலியா , அஹமதாபாத் , குஜராத் , இந்தியா , அவள் நேரம் ,

© 2025 Vimarsana