ट्रकवर मा&#x

ट्रकवर मातीचा ढिगारा आल्याने 'कोरे'च्या गाडय़ांवर अंशतः परिणाम – तरुण भारत


प्रतिनिधी/ रत्नागिरी
दक्षिणेकडील रेल्वेमार्गावरील पालघाट विभागात पादिल-कुलासेखारा येथे रेल्वे ट्रकवर पावसामुळे मातीचा ढिगारा आल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर अंशतः परिणाम झाल्याने या मार्गावरून धावणाऱया मत्स्यगंधा व मंगला एक्स्प्रेस या दोन रेल्वेगाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या.
Advertisements
 शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने दक्षिण रेल्वेवाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱया मत्स्यगंधा व मंगला एक्स्प्रेस या दोन रेल्वे रद्द कराव्या लागल्या. मुंबई सीएसएमटी-मंगळुरू जं.चा शुक्रवारचा खास प्रवास सुरथकल येथे शॉर्ट टर्मिनेशन व सुरथकल व मंगळुरू जंक्शनदरम्यान अंशतः रद्द करण्यात आला. मंगलरु जं.-मुंबई सीएसएमटीचा विशेष प्रवास मंगळुरू जंक्शन दरम्यान अंशतः रद्द करण्यात आला होता. मंगळुरू मध्यवर्ती-लोकमान्य टिळक (टी) 16 जुलै रोजीचा विशेष प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. तसेच एर्नाकुलम जं. -निजामुद्दीन एक्स्प्रेस अन्य मार्गावरून वळविण्यात आली. कारवार- केएसआर बेंगलुरू दैनिक विशेष रेल्वे यादिवशी पूर्णपणे रद्द करण्यात आली.
Share

Related Keywords

Konkan , Maharashtra , India , Mumbai , Ratnagiri , Orissa , Bengaluru , Karnataka , , Express , Konkan Railway , Ratnagiri South Railroad , Mangala Express , July Table , Karwar Bengaluru , கொங்கன் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , மும்பை , ரதணகிரி , ஓரிஸ்ஸ , பெங்களூரு , கர்நாடகா , எக்ஸ்பிரஸ் , கொங்கன் ரயில்வே , மங்கள எக்ஸ்பிரஸ் ,

© 2025 Vimarsana