भारतीय वं&#x

भारतीय वंशाची शिरीषा होणार अंतराळवीर


वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : न्यू मेक्सिकोतील वाळवंटातल्या व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या तळावरून ‘स्पेसफ्लाइट युनिटी २२’ हे यान भारतीय वेळेनुसार रविवारी ११ जुलै रोजी रात्री आठ वाजता अंतराळाच्या दिशेने झेपावले. या यानामधून भारतात जन्मलेली शिरीषा बांदला ही अंतराळ प्रवासाला निघणार आहे. याआधी रशियाच्या यानातून भारताच्या विंग कमांडर राकेश शर्मा यांनी अंतराळ प्रवास केला होता. ते पहिले भारतीय अंतराळवीर होते. त्यानंतर हरयाणातील करनालमध्ये जन्मलेल्या आणि नंतर अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेल्या कल्पना चावला हिने अमेरिकेच्या यानातून अंतराळ प्रवास केला. पण पृथ्वीवर परतताना यानाचा स्फोट झाला. या दुर्घटनेत कल्पना चावला आणि अन्य सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतून धडा घेऊन चुका सुधारत अमेरिकेने पुन्हा अंतराळ मोहिमा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नंतर भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स हिने अमेरिकेच्या यानातून अंतराळ प्रवास केला. आता भारतात जन्मलेली शिरीषा बांदला अंतराळ प्रवास करणार आहे.
शिरीषा बांदला हिचा जन्म भारतातील आंध्र प्रदेशमध्ये झाला असून ती जेमतेम चार वर्षांची असताना घरच्यांसोबत अमेरिकेत गेली आणि तिथेच स्थायिक झाली. पहिल्यांदाच अंतराळाचा प्रवास करणार असलेल्या शिरीषावर राकेश शर्मा यांचा प्रभाव आहे. शिरीषा हिने अमेरिकेतील विद्यापीठातून एमबीए केले. तसेच २०११ मध्ये तिने एअरोस्पेस, विमान उड्डाण प्रशिक्षण आणि अंतराळ अभियांत्रिकी शाखेतले शिक्षण पूर्ण केले. बुद्धिमत्ता आणि कौशल्य तपासून शिरीषा बांदला हिची अंतराळ मोहिमेसाठी निवड झाली आहे. शिरीषा ज्या मोहिमेत सहभागी होत आहे ती खासगी अंतराळ मोहीम आहे. इंग्लंडचे अब्जाधीश व्यावसायिक रिचर्ड ब्रँसन यांच्या पुढाकारातून निघणार असलेल्या खासगी अंतराळ मोहिमेतून शिरीषा बांदला अंतराळाचा प्रवास करणार आहे. ब्रँसन यांच्या पाठोपाठ नऊ दिवसांत जेफ बेजोस हे अब्जाधीश व्यावसायिक खासगी अंतराळ मोहीम काढणार आहेत. या दोन्ही मोहिमांकडे जगाचे लक्ष आहे.

Related Keywords

India , Russia , Washington , United States , Haryana , Rakesh Sharma , Kalpana Chawla , Sunita Williams , Us University , Aryan India , Sunday July , Russia India , Haryana Born , India Andhra Pradesh , Engineering Education , இந்தியா , ரஷ்யா , வாஷிங்டன் , ஒன்றுபட்டது மாநிலங்களில் , ஹரியானா , ராகேஷ் ஷர்மா , கல்பனா சாவ்லா , சுனிதா வில்லியம்ஸ் , எங்களுக்கு பல்கலைக்கழகம் , ஞாயிற்றுக்கிழமை ஜூலை , ரஷ்யா இந்தியா , இந்தியா ஆந்திரா பிரதேஷ் , பொறியியல் கல்வி ,

© 2025 Vimarsana