More than one lakh foreign traders flee Singapore due to str

More than one lakh foreign traders flee Singapore due to strict carnage regulations, drop in vaccination | सिंगापूरमधून एक लाखाहून जास्त परदेशी व्यावसायिकांचे काेराेनाच्या कडक नियमांमुळे पलायन, लसीकरणात घट


More Than One Lakh Foreign Traders Flee Singapore Due To Strict Carnage Regulations, Drop In Vaccination
दिव्य मराठी विशेष:सिंगापूरमधून एक लाखाहून जास्त परदेशी व्यावसायिकांचे काेराेनाच्या कडक नियमांमुळे पलायन, लसीकरणात घट
सिंगापुर / व्ही.के. संतोष कुमार14 तासांपूर्वी
कॉपी लिंक
सिंगापूरमध्ये स्थानिक लाेकांचा विचार करून स्थलांतरित धाेरणाची आखणी
सिंगापूरकडून जगभरातील व्यावसायिकांचा अपेक्षाभंग हाेताना दिसताे. काेराेना काळात सुमारे १.८२ लाख राेजगार कमी झाले आहेत. भारत, ब्रिटनसह जगभरातील अनेक व्यावसायिकांनी सिंगापूरचा निराेप घेतला आहे. त्यापैकी काहींना देशातील काेविड नियमांचा त्रास जाणवला. लसीकरणात कमतरता, स्थानिक लाेकांना नाेकरीत प्राधान्य इत्यादी कारणांमुळे परदेशी व्यावसायिकांनी सिंगापूर साेडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. वेल्थ मॅनेजमेंट कन्सल्टंट जिम शार्प म्हणाले, गेल्या वर्षी नाेव्हेंबरमध्ये आजारी वडिलांना भेटायला मँचेस्टरला गेलाे हाेताे. परंतु पुन्हा कधीही सिंगापूरला जाऊ शकलाे नाही. पत्नी व मुले सिंगापूरमध्ये हाेते. दरवेळी माझा अर्ज फेटाळण्यात आला. डेल्टा व्हेरिएंटमुळे मे मध्ये प्रवासावर पुन्हा बंदी लागू करण्यात आली. शेवटी हतबल हाेत मी कुटुंबाला सामान पॅक करून इंग्लंडला रवाना हाेण्याची सूचना केली.
मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनी सांता फे के व्यवस्थापकीय संचालक अँडम स्लाेअन म्हणाले, सिंगापूर साेडणाऱ्यांची संख्या येणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. देश साेडू इच्छिणाऱ्यांसाठी आम्हाला जास्त व्यवस्था करून द्यावी लागत आहे. सिंगापूरने काेविडमुळे कडक नियम लागू केले हाेते. तेव्हा ६० हजार लाेक परदेशात हाेते. त्यापैकी बहुतांश लाेक परतू शकले नव्हते. त्यापैकीच व्यंकटेश एक आहेत. सिंगापूरमध्ये स्थानिक लाेकांकडून शत्रूसारखी वागणूक दिली जात आहे. उद्याेग विश्लेषक एलेन गिलाेरी यांना फ्रान्सला परतावे लागले. त्या म्हणाल्या, लसीच्या नाेंदणीसाठी सिंगापूरबाहेरील नागरिकांना केवळ एक दिवस दिला जात आहे. म्हणूनच आता सिंगापूर परदेशी नागरिकांसाठी सुपर फ्रेंडली राहिलेले नाही.
२०१९ मध्ये २५ टक्के परदेशी कामगार, २०२१ मध्ये एक
सिंगापूरने परदेशी श्रमावरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला आहे. मार्चमध्ये माजी मनुष्यबळ विकास मंत्री जाेसेफिन टीआे यांनी कंपनीशी सिंगापूरच्या मूळ निवासींना बळकट करण्याचे आवाहन केले हाेते. गेल्या वर्षी ईपी हाेल्डरचे वेतनही दुप्पट वाढवले हाेते. त्यामुळे परदेशी व्यावसायिकांसाठी काम शाेधण्याचा संघर्षही वाढला आहे. ब्लॅक स्वान ग्रुपचे रिचर्ड एल्ड्रिज म्हणाले, तुम्ही कंपनीचे संचालक असल्यास ईपी हाेल्डरला नाेकरीवर ठेवणे कठीण काम आहे. कंपनीत २०१९ मध्ये २५ टक्के परदेशी कामगार हाेते. २०२१ मध्ये संख्या एक झाली.
बातम्या आणखी आहेत...

Related Keywords

New Mexico , United States , India , France , Singapore , , Wealth Management Consultant , Delta May , Santa Fe New Mexico , புதியது மெக்ஸிகோ , ஒன்றுபட்டது மாநிலங்களில் , இந்தியா , பிரான்ஸ் , சிங்கப்பூர் , செல்வம் மேலாண்மை ஆலோசகர் , டெல்டா இருக்கலாம் , சாந்தா ஃபே புதியது மெக்ஸிகோ ,

© 2025 Vimarsana