टीम इंडिय&#x

टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचा भरगच्च कार्यक्रम समोर आला आहे. सध्या भारताचा एक संघ इंग्लंड दौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. तर दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून त्याचं नेतृत्व शिखर धवन करत आहे. टी-२० वर्ल्डकपमुळे त्यात भर पडली आहे.
भारताचा श्रीलंका दौरा
श्रीलंका दौऱ्यात भारत एकूण ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १३ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. हे सामने २५ जुलैपर्यंत असणार आहेत. या मालिकेसाठी संघात देवदत्त पडिक्कल, मनीष पांडे, नितीश राणा, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायवाड, शिखर धवन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कृष्णप्पा गॉथम, कृणाल पंड्या, इशान किशन, संजू सॅमसन, भुवनेश्वर कुमार, चेतन साकरिया, दीपक चहर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, राहुल चहर, वरुण चक्रवर्थी आणि यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे.
भारताचा इंग्लंड दौरा
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. या दौऱ्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ४ ऑगस्टपासून सुरू होणारी ही मालिका १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. भारतीय संघात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, लोकेश विहारी, मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, शुबमन गिल, अक्षर पटेल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा समावेश आहे.
आयपीएल स्पर्धेचं आयोजन
या दौऱ्यानंतर आयपीएल स्पर्धेचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. यूएईत हे सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून उर्वरित ३१ सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी २१ दिवसांचं वेळापत्रक आखण्यात आले आहे. या २१ दिवसांत १० डबलहेडर्स, ७ सिंगल हेडर्स आणि ४ प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहे. टी २० विश्वचषकाच्या दोन दिवस आधी ही स्पर्धा संपणार आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धा
१७ ऑक्टोबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत यूएईत टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. या अहवालानुसार, राऊंड १ मध्ये १२ सामने होणार असून त्यामध्ये ८ संघ भिडणार आहेत. ८ पैकी ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. सुपर १२ साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे.
भारत-न्यूझीलंड कसोटी
टी २० स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारतीय संघाची न्यूझीलंडसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका आहे. श्रीलंका दौरा, इंग्लंड दौरा, आयपीएल आणि टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडसोबत खेळणार आहे. या मालिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भारत विरुद्ध द. आफ्रिका
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचं डिसेंबर-जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यात ३ कसोटी सामन्यांची मालिका आणि ३ टी २० सामन्यांची मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघांचे येत्या काळात व्यस्त वेळापत्रक असणार आहे. या वेळापत्रकामुळे खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार आहे.

Related Keywords

Bangladesh , India , United Kingdom , Washington , United States , New Delhi , Delhi , Papua New Guinea , Ireland , Sri Lanka , Woman , Scotland , Sultanate Of Oman , Kuldeep Yadav , Mayank Agarwal , Mohammad Siraj , Ajinkya Rahane , Hanuma Vihari , Ishan Kishan , Bhuvneshwar Kumar , Sanju Samson , Cheteshwar Pujara , Rohit Sharma , Mohammed Shami , Shikhar Dhawan , Suryakumar Yadav , Wriddhiman Saha , Ishant Sharma , Virat Kohli , Lokesh Vihari , Umesh Yadav , India Union , Ii Union Sri Lanka , Indiaa Union England , Union Super , Intel , Union England , India Sri Lanka , India England , August Start , September Start , October November , பங்களாதேஷ் , இந்தியா , ஒன்றுபட்டது கிஂக்டம் , வாஷிங்டன் , ஒன்றுபட்டது மாநிலங்களில் , புதியது டெல்ஹி , டெல்ஹி , பப்புவா புதியது கினியா , ஐயர்ல்யாஂட் , ஸ்ரீ லங்கா , ஓமான் , ஸ்காட்லாந்து , சுல்தானேட் ஆஃப் ஓமான் , குல்தீப் யாதவ் , மயங்க் அகர்வால் , முகமது சிராஜ் , ஹனுமா விஹாரி , இஷான் கிஷன் , புவனேஷ்வர் குமார் , சஞ்சு சாம்சன் , சேடேஸ்வர பூஜாரா , ரோஹித் ஷர்மா , முகமது ஷமி , ஷிகர் தவான் , சூரியாக்குமார் யாதவ் , இஷண்ட் ஷர்மா , விராட் கோஹ்லி , உமேஷ் யாதவ் , இந்தியா தொழிற்சங்கம் , தொழிற்சங்கம் அருமை , இன்டெல் , தொழிற்சங்கம் இங்கிலாந்து , இந்தியா ஸ்ரீ லங்கா , இந்தியா இங்கிலாந்து , அக்டோபர் நவம்பர் ,

© 2025 Vimarsana