आरोग्यपू

आरोग्यपूरक उत्पादनांची बाजारपेठ


अजय तिवारी
कोरोना काळात लोक शाश्वत जीवनशैलीकडे वळत असल्याचं पाहायला मिळतं. विविध आजारांचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती बळकट असणं आवश्यक असतं. कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व अधोरेखित झालं. त्यातच कोरोनावर कोणताही उपचार नसल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीनेच मात करणं शक्य असल्याचं समोर आल्यानंतर लोक आरोग्याबाबत जागरूक झाले. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचा, उत्पादनांचा, वनौषधींचा आणि विविध प्रकारच्या मसाल्यांचा वापर सुरू झाला, व्यायामाचं प्रमाण वाढलं. अनेक कंपन्यांनी काळाची पावलं ओळखत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी उत्पादनं बाजारात उतरवली. या उत्पादनांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसलं. कॉफी शॉप्समध्ये हळदयुक्त कॉफी मिळू लागली. हळदयुक्त, दालचिनीयुक्त, मध घातलेलं दूध, आईस्क्रीम मिळू लागलं. अशाच पद्धतीची इतर अनेक उत्पादनं बाजारात उपलब्ध झाली म्हणूनच रोगप्रतिकार शक्ती वाढणाऱ्या उत्पादनांच्या बाजारपेठेत गेल्या वर्षभरात थोडीथोडकी नाही, तर तब्बल १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टसच्या (एआयओसीडी) अहवालातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, २०१९च्या तुलनेत २०२०मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या उत्पादनांवर पाचपट अधिक खर्च करण्यात आला आहे.
या अहवालानुसार जून २०२०मध्ये ‘ग्लेनमार्क फार्मा’ने फेव्हपीरावीर या विषाणूविरोधी औषधाची निर्मिती केली. फक्त हे एक औषध विकून कंपनीने गेल्या वर्षभराच्या काळात तब्बल ९७५ कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे. कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर वर्षभराच्या काळात ८३३ कोटी रुपयांचं रेमडेसिव्हिर विकलं गेलं आहे. या इंजेक्शनच्या विक्रीतून सिप्ला आणि कॅडिला या औषध कंपन्यांना अनुक्रमे ३०९ कोटी आणि २१५ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. प्रतिजैविक म्हणून वापरल्या जाणाऱ्या अझिथ्रोमाइसिनची ९९२ कोटी रुपयांची विक्री झाली असून वर्षभराच्या काळात या औषधाच्या विक्रीत ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
‘फॉर्च्युन’ मासिकाच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये रोगप्रतिकारक पदार्थांची जागतिक पातळीवरील उलाढाल एक लाख ४७ हजार कोटी रुपयांच्या घरात होती. २०२८ पर्यंत हा आकडा दोन लाख तीस हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. आयुर्वेदाचं वरदान लाभलेल्या भारतातही अशा उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आणि त्यातही मार्च तसंच एप्रिल महिन्यात देशातल्या अनेक शहरांमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या आणि उत्पादनांच्या विक्रीत वाढ झाल्याचं दिसलं आहे. विशेषकरून महानगरांमधल्या लोकांनी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आयुर्वेदिक उत्पादनांवर भर दिल्याचं दिसून आलं.
आयुर्वेदिक औषधं तयार करणाऱ्या कंपन्यांनी जारी केलेल्या अहवालानुसार दिल्ली, बंगळूरु, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीत वाढ झाली. २०२१च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये महाराष्ट्रात आयुर्वेदिक उत्पादनांच्या विक्रीत ३१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. त्यानंतर कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांमध्ये प्रत्येकी दहा टक्के इतकी वाढ नोंदवली गेली. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांच्या काळात दिल्लीमध्ये आयुर्वेदिक काढे तसंच वनौषधींच्या रसांच्या मागणीत १०० टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं. याच काळात मुंबई आणि बंगळूरुमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या उत्पादनांच्या वापरात अनुक्रमे ३० आणि २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या अनेक भारतीय कंपन्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीत प्रचंड वाढ नोंदवली. डाबर कंपनीच्या च्यवनप्राशच्या विक्रीत २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ६९४ टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच त्याचं मध आणि हनीटस या उत्पादनांच्या विक्रीत अनुक्रमे ६० आणि ८० टक्क्यांनी वाढ झाली. यासोबतच अश्वगंधा, गिलोय, कोरफडीचा रस, आवळ्याचा रस या उत्पादनांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यात मध, ग्रीन टी, कडुनिंब, तुळशीयुक्त पेयं तसंच साबणांची विक्री साठ टक्क्यांवरून १५७ टक्क्यांपर्यंत वाढली. कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधं घेणं योग्य असलं तरी कोणतंही औषध किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं उत्पादन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवं, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
या काळात आवळा, भात, लिंबू आणि कोथिंबिरीचं सूप, हळदीचं दूध अशा पदार्थांना प्रचंड मागणी आहे. अर्थात विविध जà

Related Keywords

Mumbai , Maharashtra , India , Karnataka , United States , Pune , Bangalore , Delhi , Amla , Madhya Pradesh , America , , Dabur , India Organisation , Cipla , All India Organisation , Maharashtra Ayurvedic , New Delhi Ayurvedic , மும்பை , மகாராஷ்டிரா , இந்தியா , கர்நாடகா , ஒன்றுபட்டது மாநிலங்களில் , புனே , பெங்களூர் , டெல்ஹி , ஆம்லா , மத்யா பிரதேஷ் , அமெரிக்கா , டபூர் , இந்தியா ஆர்கநைஸேஶந் , சிப்லா , அனைத்தும் இந்தியா ஆர்கநைஸேஶந் ,

© 2025 Vimarsana