कोल्हापूर \ ऑनलाईन टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 2 वाजता कोल्हापूरमधील पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. उद्धव ठाकरे दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होतील. यायोबतच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार तसे आमदार रोहित पवार यांनी देखील कोल्हापूर पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. Live Update : Advertisements उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालय पूरग्रस्त निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्तांची संवाद साधला. Share previous post