vimarsana.com


July 18, 2021
16
अवघ्या 5 दिवसांवर स्पर्धा येऊन ठेपली असताना आणखी एक धक्का
टोकियो / वृत्तसंस्था
Advertisements
ऑलिम्पियन ऍथलिट्स व पदाधिकाऱयांचा सहभाग असलेल्या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केली असून एक बिगर ऍथलिट कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. सदर व्यक्ती जपानबाहेरील असून त्या व्यक्तीला 14 दिवस क्वारन्टाईन केले असल्याचे आयोजन समितीने स्पष्ट केले. यंदाची ऑलिम्पिक दि. 23 पासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर, कोरोनाच्या ऑलिम्पिक व्हिलेजमधील एन्ट्रीमुळे खळबळ उडाली आहे.
आयोजन समितीचे अध्यक्ष सेईको हाशिमोतो यांनी ऑलिम्पिक व्हिलेजमधील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याच्या वृत्ताला यावेळी दुजोरा दिला. मात्र, याच्याशी संबंधित अन्य कोणतेही तपशील उघड केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
सदर व्यक्ती ‘गेम्स कन्सर्न पर्सनल’ या नात्याने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये समाविष्ट होता. टोकियो बेवरील ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये ऑलिम्पिकदरम्यान 11 हजारपेक्षा अधिक ऍथलिट्स व अन्य स्टाफ असणार आहे. सध्या एक कोरोनाबाधित आढळून आला असला तरी ऑलिम्पिक व्हिलेजमधील आणखी कोणाही ऍथलिटला किंवा कोणत्याही सदस्याला त्याची लागण होण्याची फारशी शक्यता नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले.
1 जुलैपासून आपल्या जुरिस्डिक्शनमध्ये 45 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून त्यातील फक्त 1 जण ऑलिम्पिक व्हिलेजमधील आहे. व्हिलेजमध्ये सध्या किती सदस्य आहेत, हे सांगू शकत नसल्याचे आयोजन समितीने म्हटले. शनिवारी जपानमध्ये 1410 नवे रुग्ण आढळून आले. आठवडाभरापूर्वी ही संख्या 950 च्या आसपास होती.
ऑलिम्पिकला पाठिंबा द्या
आयवोसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी ऑलिम्पिकला पाठिंबा द्या, असे आवाहन जापनीज नागरिकांना यावेळी केले. जपानमध्ये येणाऱया ऍथलिट्सचे स्वागत करावे, असे ते म्हणाले.
भारतीय तिरंदाजी संघ ऑलिम्पिकला रवाना
Tokyo: Indian rowing team Jat Arjun Lal and Arvind Sing during a training session ahead of Tokyo Olympics, in Tokyo, Saturday, July 17, 2021. (PTI Photo)(PTI07_17_2021_000115B)
नवी दिल्ली ः अनुभवी दीपिका कुमारी व अतानू दास यांच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजी संघ शनिवारी टोकियोकडे रवाना झाले. अतानू दासने ट्वीट करत याची माहिती दिली. अतानू दास, तरुणदीप राय, महिला गटात दीपिका यांच्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताची मुख्य भिस्त असणार आहे.
पुणे येथे आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्समधील फायनल सिलेक्शन ट्रायलनंतर 6 सदस्यीय संघाची ऑलिम्पिकसाठी अंतिम निवड केली गेली. यात 3 पुरुष व 3 महिला तिरंदाजांचा समावेश आहे. पुरुष गटात अतानू दास, तरुणदीप, प्रवीण जाधव तर महिला गटात दीपिका कुमारी, अंकिता, कोमोलिका बारी भारताचे प्रतिनिधीत्व करतील.
इतिहासाची पाने उलगडताना…
1924 पॅरिस ऑलिम्पिक
@पॅरिसने ऑलिम्पिक भरवण्याची ही इतिहासातील दुसरी वेळ ठरली. दोनवेळा ऑलिम्पिक यजमानपद भूषवणारे पहिले शहर म्हणून पॅरिसची इतिहासात नोंद झाली. या ऑलिम्पिकमध्ये 3 हजार ऍथलिट सहभागी झाले. त्यात 100 पेक्षा अधिक महिला ऍथलिट्सचा समावेश होता. 44 देशांचा यात सहभाग राहिला.
@पॅरिसमधील या ऑलिम्पिकच्या माध्यमातूनच ऑलिम्पिक व्हिलेजची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली गेली. ऑलिम्पिकसाठी येणाऱया ऍथलिट्स व पदाधिकाऱयांची निवासाची सोय करण्यासाठी ऑलिम्पिक व्हिलेज (क्रीडाग्राम) उभारले गेले. लाकडी केबिन्स, असे या ऑलिम्पिक व्हिलेजचे स्वरुप होते. सध्या ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये अपार्टमेंट्स भाडे तत्वावर घेतले जातात.
@ब्रिटीश धावपटू हॅरॉल्ड अब्राहम्स व एरिक लिडेल यांनी अनुक्रमे 100 मीटर्स व 400 मीटर्सचे इव्हेंट जिंकले. मात्र लिडेलने 100 मीटर्सची इव्हेंट रविवारी असल्याने त्यात सहभागी होण्यास चक्क नकार दिला. ख्रिस्तियन असल्याने त्याने हे पाऊल उचलले व नंतर 1981 मध्ये चॅरिओट्स ऑफ फायर चित्रपटात या घटनेचा समावेश केला गेला होता.
@आयर्लंडने याच ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र राष्ट्र या नात्याने पदार्पण केले.
1928 ऍमस्टरडम ऑलिम्पिक
@या ऑलिम्पिकमध्ये प्रथमच क्रीडाज्योत प्रज्वलित केली गेली आणि ती परंपरा आजतागायत सुरु आहे. ऍमस्टरडममध्ये स्टेडियमच्या शिखरावर टॉवरमध्ये क्रीडाज्योत तेवत ठेवली गेली होती.
@अनेक स्पर्धकांच्या मानांकनाबद्दल प्रश्नचिन्ह असल्याने या ऑलिम्पिकमधून टेनिसला वगळले गेले. येथे प्रथमच ऑलिम्पिक्सचे जनक असलेल्या ग्रीसला पथसंचलनात प्रथम प्राधान्य दिले गेले. यजमान देशाचे पथक सर्वात शेवटी सहभागी झाले. हीच परंपरा आजही कायम आहे.
@जिम्नॅस्टिक्स व ऍथलेटिक्समध्ये महिलांना अखेर सहभागी होण्याची परवानगी मिळाली आणि यामुळे ऑलिम्पिकमध्ये सहभागी महिला ऍथलिटची संख्या दुपटीने वाढली. ऑस्ट्रेलियन नौकानयनपटू हेन्री पियर्सने उपांत्यपूर्व लढतीदरम्यान बदकांचे एक कुटुंब पार होईतोवर थांबणे पसंत केले. पण, यानंतरही ती शर्यत जिंकत सुवर्णपदक संपादन केले.
@भारतीय हॉकी संघाने पहिलेवहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले. त्यानंतर या खेळात संघाने सलग 6 सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.
भारतीय नेमबाजांचा सराव उद्यापासून
नवी दिल्ली ः क्रोएशियाहून दाखल झाले असल्याने क्वारन्टाईन होण्याची आवश्यकता नसल्यामुळे भारतीय नेमबाज उद्यापासून (सोमवार दि. 19) सरावाला सुरुवात करणार आहे. शनिवारी पहाटे नेमबाजांचे पथक गेम्स व्हिलेजमध्ये दाखल झाले. यंदा ऑलिम्पिकमधील शुटिंग इव्हेंट असाका शुटिंग रेंजवर घेतले जाणार आहे. 1964 ऑलिम्पिकमध्येही याच ठिकाणी नेमबाजीचे इव्हेंट्स घेतले गेले होते.
‘युरोपवरुन लाँग फ्लाईट असल्याने जेट लॅग साहजिक आहे. त्यामुळे, पुरेशी विश्रांती घेऊन सर्व नेमबाज उद्यापासून सराव सुरु करतील’, असे भारतीय राष्ट्रीय संघटनेचे सचिव राजीव भाटिया वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
भारतीय नेमबाज यापूर्वी सरावासाठी आणि झाग्रेब येथील स्पर्धेत भाग घेण्यासाठी क्रोएशियात होते. तेथून ते टोकियोत दाखल झाले. त्यामुळे, त्यांना क्वारन्टाईन होण्याची आवश्यकता नव्हती. जे ऍथलिट भारतातून जपानमध्ये पोहोचतील, त्यांना मात्र 3 दिवस क्वारन्टाईन सक्तीचे असणार आहे.
भारताच्या ऑलिम्पिक पथकात 15 नेमबाज समाविष्ट असून यात 8 रायफल, 5 पिस्तोल व 2 स्कीट शूटर्सचा समावेश आहे. याशिवाय, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफचे सदस्य समवेत आहेत.
ऑलिम्पिकसाठी सिंधूची तयारी दमदार- प्रशिक्षक पार्क
नवी दिल्ली ः बचाव तोकडा पडत असल्याने पीव्ही सिंधूची कामगिरी वर्षभराच्या कालावधीत खालावली. मात्र, टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर, तिने ही त्रुटी दूर करण्यासाठी तसेच आपल्या मोशन स्कील्सवर अधिक मेहनत घेतली असल्याने येथे वेगळी सिंधू दिसून येईल, असा विश्वास भारताचे विदेशी प्रशिक्षक पार्क ते-सँग यांनी व्यक्त केला.
42 वर्षीय पार्क हे 2019 पासून भारतीय पुरुष एकेरी संघाचे प्रशिक्षक राहिले असून येथे ते सिंधूला देखील प्रशिक्षण देत आहेत. सहकारी कोरियन प्रशिक्षक किम जी हय़ून 2 वर्षांपूर्वी बॅसेल वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर मायदेशी रवाना झाल्याने पार्क यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे. पार्क यांनी 2013 ते 2018 या कालावधीत कोरियन बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
कोव्हिड-19 ब्रेकनंतर सिंधूला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे यश अजिबात मिळवता आलेले नाही. थायलंडमधील 2 स्पर्धांमध्ये ती अनुक्रमे पहिल्या फेरीत व उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारु शकली. त्यानंतर वर्ल्ड टूर फायनल्समध्ये तर बाद फेरीसाठीही तिला पात्र ठरता आले नाही. पुढे स्विस टूरमध्ये फायनलमध्ये धडक मारत तिने या अपयशाची कसर भरुन काढण्याचा प्रयत्न केला.
सिंधूच्या डिफेन्समध्ये बऱयाच त्रुटी होत्या. कॅरोलिना मारिन व पॉनपवी हे आक्रमक खेळाडू असून हाफ स्मॅश व स्ट्रेट स्मॅशवर त्यांचा अधिक भर राहत आला. त्यांच्यासमोर खेळताना सिंधूची पिछेहाट होत होती. मात्र, आता तिने या आघाडीवर बरीच मेहनत घेतली आहे, असे पार्क याप्रसंगी म्हणाले. कॅरोलिना मारिन यंदा खेळणार नसल्याने तई त्झू ही सिंधूची ऑलिम्पिकमधील मुख्य प्रतिस्पर्धी असू शकते, याचा त्यांनी येथे उल्लेख केला.
Share
previous post
next post
Related Stories

Related Keywords

Australia ,Japan ,Tokyo ,India ,United Kingdom ,Paris ,France General ,France ,New Delhi ,Delhi ,Pune ,Maharashtra ,Switzerland ,Australian ,British ,Swiss , ,Olympics The Committee ,Office Olympics ,Olympics ,India Archery Union ,Committee President ,Tokyo Olympics ,Committee President Thomas ,Saturday Japan New ,President Thomas ,Archery Union Saturday ,Olympics India ,Deepika Miss ,Bari India ,Paris Olympics ,Olympics Village ,Australian Henry ,Association Secretary Rajiv Bhatia ,India Japan ,India Olympics ,Olympics Arena ,Spark New Delhi ,ஆஸ்திரேலியா ,ஜப்பான் ,டோக்கியோ ,இந்தியா ,ஒன்றுபட்டது கிஂக்டம் ,பாரிஸ் ,பிரான்ஸ் ,புதியது டெல்ஹி ,டெல்ஹி ,புனே ,மகாராஷ்டிரா ,சுவிட்சர்லாந்து ,ஆஸ்திரேலிய ,பிரிட்டிஷ் ,சுவிஸ் ,அலுவலகம் ஒலிம்பிக்ஸ் ,ஒலிம்பிக்ஸ் ,குழு ப்ரெஸிடெஂட் ,டோக்கியோ ஒலிம்பிக்ஸ் ,ப்ரெஸிடெஂட் தாமஸ் ,ஒலிம்பிக்ஸ் இந்தியா ,பாரிஸ் ஒலிம்பிக்ஸ் ,ஒலிம்பிக்ஸ் கிராமம் ,இந்தியா ஜப்பான் ,இந்தியா ஒலிம்பிக்ஸ் ,பூங்கா புதியது டெல்ஹி ,

© 2025 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.